Join us

राज्यात पावसाचा जोर वाढणार, आज 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Updated: September 8, 2023 19:28 IST

राज्यात पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आज वर्तवली ...

राज्यात पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आज वर्तवली आहे. पुढील तीन दिवस ही दिवस पावसाचे असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र आहे.

दरम्यान, हवामान विभागाने काही जिल्ह्यांना आज ऑरेंज व यलो अलर्ट दिले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून मुंबई ठाणे पालघर सह संपूर्ण कोकणपट्टा,तसेच नाशिक मध्य महाराष्ट्र विदर्भातील बहुतांश भागात तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कुठे आहे ऑरेंज अलर्ट?

आज कोकण विभागातील पालघर,ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून नाशिक, पुणे , सातारा जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड , लातूर हे तीन जिल्हे वगळता उर्वरित भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज राज्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला असून 12 सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार मध्यम ते हलक्या सरींचा पाऊस अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजपाऊसमोसमी पाऊसमहाराष्ट्रशेतकरीमराठवाडाहवामान