मुंबई : मुंबईतील गारेगार वातावरण कायम असून गुरुवारी किमान तापमान १७ अंश सेल्सिअस होते. तर ठाण्याचे २० अंश नोंदविण्यात आले.
उत्तरोत्तर यात आणखी वाढ होईल आणि हे तापमान २० ते २२ अंशादरम्यान नोंदविण्यात येईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव कमी होणार असून, दक्षिणेकडील मान्सूनच्या हवामानाचा किंचित प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे तापमानात वाढ होईल.
येत्या ४ डिसेंबरपर्यंत सामान्यापेक्षा कमीच
◼️ ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात कमाल तापमान ४ डिसेंबरपर्यंत सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होईल.
◼️ तर, सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी २१-२२ नोव्हेंबरपर्यंत जाणवू शकते. २३ नोव्हेंबरपासून थंडी कमी होण्याची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
किमान तापमान नोंद (अंश सेल्सिअस)
अहिल्यानगर ९.४
छत्रपती संभाजीनगर ११.९
डहाणू १६.१
जळगाव ११.२
जेऊर ८
महाबळेश्वर १२.४
मालेगाव ९.८
नांदेड ११
नंदुरबार १३.२
नाशिक ९.८
धाराशिव १३.४
पालघर १३.६
परभणी १२
सांगली १५.८
सातारा १३
सोलापूर १५.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
अधिक वाचा: Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर
