Lokmat Agro >हवामान > ४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी

४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी

Sina Dam filled in June for the first time in 40 years; Water started flowing from the spillway | ४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी

४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी

Sina Dam : सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी धरण भरले आहे.

Sina Dam : सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी धरण भरले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी धरण भरले आहे.

शनिवारी सकाळी ७ वाजता धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पाणी झेपावले. सीना धरण भरले असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली. यासह विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनीदेखील आपल्या सोशल मीडियाद्वारे धरण भरले असल्याचे जाहीर केले.

कर्जत तालुक्यातील २१ गावांना लाभदायी ठरणारे सीना धरण ओव्हरफ्लो झाल्याने कर्जत तालुक्यासह लगतच्या आष्टी, श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतिहासात प्रथमतःच जून महिन्यात सीना धरण भरले असल्याची माहिती परिसरातील ज्येष्ठ शेतकरी आणि नागरिक सांगत आहे.

यंदा मे महिन्यातच कर्जत तालुक्यात पावसाने साडेतीनशे मिलीमीटर पावसाची नोंद केली होती. यासह जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्चातदेखील बहुतांश ठिकाणी वादळी वान्यासह मान्सून पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील ओढे, नाले, बंधारे मे महिन्यात अक्षरशः भरभरून वाहिले.

यासह जिल्ह्यातदेखील पावसाने सर्वत्र मोठ्या प्रमाणात विक्रमी नोंद केली होती. मागील तीन दिवसांपासून सीना धरण क्षेत्र परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी सकाळी ७ वाजता धरणाच्या सांडव्यावरून पाणी नदी पात्रात झेपावले.

सभापती, आमदारांनी व्यक्त केला आनंद

• कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्दा येथील सीना धरण जून महिन्यात भरण्याची इतिहासातील पहिलीच घटना आहे.

• १४ जून रोजी सकाळी ७ वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे.

• ही निसर्गाची आणि पावसाची कृपा असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

२२० क्युसेकने नदीपात्रात पाणी

२.४० टीएमसी क्षमता असलेल्या सौनातून दुपारी १२ वाजता २२० क्युसेक वेगाने नदी पात्रात विसर्ग सोडल्याची माहिती सीना धरणाचे सहायक अभियंता संभाजी पवार यांनी दिली.

पाण्याचा विसर्ग हा शेतकऱ्यांचा आनंद : पवार

कर्जत तालुक्यातील २१ गावांसह आष्टी, नगर, आणि श्रीगोंदा या तालुक्यातील काही गावांसाठी जीवनदायी असलेले सीना धरण यंदा प्रथमच १४ जून रोजी भरले आहे. या धरणाच्या सांडव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग हा शेतकऱ्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

Web Title: Sina Dam filled in June for the first time in 40 years; Water started flowing from the spillway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.