Join us

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील साठ्यात झपाट्याने घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 10:35 IST

कडक उन्हाळा आणि पिकांना पाण्याची मोठी गरज भासत असल्याने नदीपात्रातील पाणीउपसा वाढला आहे. यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

प्रकाश पाटीलकोपार्डे : कडक उन्हाळा आणि पिकांना पाण्याची मोठी गरज भासत असल्याने नदीपात्रातील पाणीउपसा वाढला आहे. यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

जिल्ह्यात ८ धरणे व १६ लघु पाटबंधारे तलाव आहेत. मागील वर्षी पावसाने ओढ दिली असली तरी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. ऑक्टोबरनंतर एखादाही वळीव पाऊस झाला नसल्याने पिण्यासाठी, औद्योगिक व शेतीसाठी सातत्याने उपसा सुरू आहे.

पावसाच्या कमतरतेने जमिनीतील पाणीपातळीवर खालावली आहे. यामुळे शेतीसाठी पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशामुळे धरणाबरोबर नद्यातील पाण्यांचे बाष्पीभवन होत आहे.

धरणांतील यंदाचा व गतवर्षीचा पाणीसाठा

धरणाचे नावयावर्षीचामागील वर्षीचा
राधानगरी २.५३२.६८
तुळशी१.५११.३७
वारणा७.६१११.५३
दूधगंगा४.९७४.१६
कासारी१.०५०.८४
कडवी१.३२१.१२
कुंभी१.४२१.३४
पाटगाव १.६७१.२४

अधिक वाचा: ऊस तोडल्यानंतर पाचटीचे असे करा व्यवस्थापन; रासायनिक खतांवरील खर्च होईल कमी

टॅग्स :धरणकोल्हापूरपाणीराधानगरीपाऊसशेती