राधानगरी : राधानगरी धरण क्षेत्रात तीन दिवसांत विक्रमी ३१५ मि. मी पावसाची नोंद झाली. गुरुवारी सकाळी धरणातीलपाणीसाठा ६८ टक्के होता.
एका दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात ७ टक्क्यांनी वाढ होऊन शुक्रवारी धरण ७५ टक्के भरले. गतवर्षी याच दिवशी धरण ३५ टक्के भरले होते. यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
धरणात ६.२१ टीएमसी पाणीसाठा असून पाणी पातळी ३३५.१८ फुटांवर आहे. धरणातून ३१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. आज अखेर एकूण २०२६ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी १०८२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
धरणाच्या सेवा द्वारातून १,५०० क्युसेस तर वीजनिर्मिती केंद्रातून १,६०० क्युसेस असा एकूण ३,१०० क्युसेस विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण ५३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरण भरल्याची टक्केवारीतुलशी जलाशय, धामोड - ७०%दूधगंगा धरण, काळम्मावाडी - ५८%
आधी वाचा: पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर