Join us

Pune Rain Updates : पुणे जिल्ह्यांत ५ दिवसांत किती पडेल पाऊस? काय आहेत हवामान विभागाचे इशारे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 21:21 IST

Weather Updates in Pune Disctrict : पुण्याच पुढील पाच दिवसांत हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला असून अनेक भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Pune Disctrict Latest Rain Updates : राज्यात सध्या चांगला पाऊस पडत असून पुण्यातही जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. पुणे जिल्ह्यातील पश्चिमेकडे असलेल्या सह्याद्री घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. पण मध्य आणि पूर्व जिल्ह्यामध्ये पाऊस त्यातुलनेत कमी आहे. येणाऱ्या पाच दिवसांत पुण्यात किती पाऊस पडणार? तापमान किती असेल आणि वाऱ्याची दिशा काय असेल यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत.

मागील आठवड्याचे हवामानपुणे परिसरात मागील आठवड्यात कमाल तापमान २६.६ ते ३०.० अंश सेल्सिअस तर कमान तापमान २१.८ ते २३.५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ९३ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ४.१ ते ६.९ कि.मी. होता.

किती पडणार पाऊस?पुणे जिल्ह्यामध्ये २० जुलै रोजी २० मिमी, २१ जुलै रोजी २३ मिमी, २२ जुलै रोजी १५ मिमी, २३ जुलै रोजी २० मिमी आमि २४ जुलै रोजी १६ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यातील तापमान हे किमान २२ ते कमाल २९ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. 

हवामान अंदाजपुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी १७ ते ३४ कि.मी. दरम्यान राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्तेकडून ईशान्येकडे राहील.

दरम्यान, या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने योग्यरित्या ताडपत्रीने झाकून ठेवावीत. उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलवावे. पावसाचा अंदाज बघून पिकांवर बुरशीनाशक, किटकनाशकाची फवारणी करावी. 

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसपुणेशेतकरी