Join us

मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; राज्यात या १४ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस देणार दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:35 IST

Pre Monsoon Rain मोसमी पाऊस अर्थात मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून याच्या परिणामी मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात वादळी वारे व मुसळधार पाऊस पडेल.

मोसमी पाऊस अर्थात मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून याच्या परिणामी मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात वादळी वारे व मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरात दाखल झाल्यानंतर त्याची वाटचाल सुरू असून २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे ३१ मेपर्यंत राज्यात गडगडाटी पाऊस मुंबईसह महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत गडगडाटी पावसाची शक्यता आली आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, जिल्ह्यांत या पावसाचा प्रभाव अधिक असेल.

आजपासुन पुढील १५ दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनपूर्व वीजा, वारा, वादळासहित केवळ मान्सूनपूर्व वळवाच्या गडगडाटी पावसाची शक्यता जाणवते.

मुंबई समोर अरबी समुद्रात केंद्र असलेले एक व तेलंगणा राज्यावर केंद्र असलेले असे दुसरे अशा दोन आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या संयोगातून (टकरीतून) सध्या वळवाच्या पावसाची ही शक्यता निर्माण झाली आहे असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अशा चौदा जिल्ह्यात ह्या वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते.

अधिक वाचा: Cyclone Shakti: 'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; पुढील तीन दिवस या ठिकाणी जोरदार पाऊस

टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजहवामान अंदाजपाऊसचक्रीवादळमहाराष्ट्रकेरळकोकण