Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > हवामान विभागाने दिला शीत लहरीचा इशारा; राज्यात नाताळपर्यंत हुडहुडी राहणार कायम

हवामान विभागाने दिला शीत लहरीचा इशारा; राज्यात नाताळपर्यंत हुडहुडी राहणार कायम

Meteorological Department warns of cold wave; Chilly weather will continue in the state till Christmas | हवामान विभागाने दिला शीत लहरीचा इशारा; राज्यात नाताळपर्यंत हुडहुडी राहणार कायम

हवामान विभागाने दिला शीत लहरीचा इशारा; राज्यात नाताळपर्यंत हुडहुडी राहणार कायम

Maharashtra Winter Update : राज्यात सध्या अधिक प्रमाणात थंड वारे वाहू लागले आहे. परिणामी सर्वत्र यंदा थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान या थंडीच्या कडकाचा रब्बी पिकांना देखील काही अंशी फटका बसतो आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यात किती दिवस राहणार थंडीचा मुक्काम. 

Maharashtra Winter Update : राज्यात सध्या अधिक प्रमाणात थंड वारे वाहू लागले आहे. परिणामी सर्वत्र यंदा थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान या थंडीच्या कडकाचा रब्बी पिकांना देखील काही अंशी फटका बसतो आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यात किती दिवस राहणार थंडीचा मुक्काम. 

राज्यात सध्या अधिक प्रमाणात थंड वारे वाहू लागले आहे. परिणामी सर्वत्र यंदा थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान या थंडीच्या कडकाचा रब्बी पिकांना देखील काही अंशी फटका बसतो आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यात किती दिवस राहणार थंडीचा मुक्काम.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्र गारठला असून ही हुडहुडी नाताळपर्यंत राहील, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच शहरांचा पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे.

अहिल्यानगर, नाशिक, सातारा, पुणे, बारामती, नांदेड, जेऊर, धाराशिव, जळगाव, मालेगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या सर्व शहरांत किमान तापमानाची नोंद १० अंश सेल्सिअस एवढी झाली आहे.

राज्यात कुठे किती नोंदवले गेले किमान तापमान ?

मुंबई १६.६°पुणे ८.८°अमरावती १०.९°
महाबळेश्वर १२.९°बारामती ७.७°भंडारा१०°
नंदुरबार १२.९° नांदेड ९.९° बुलढाणा १३.२° 
अहिल्यानगर ७.५°परभणी ११.५°चंद्रपूर१२°
कोल्हापूर १४°माथेरान१७.२°गडचिरोली११.४°
सांगली११.७° जेऊर६°गोंदिया९.२°
सोलापूर१२.६°धाराशिव१०.५°नागपूर१०°
छ. संभाजीनगर११.२° जळगाव७°वर्धा११.२°
नाशिक ८.६°मालेगाव८.६°वाशिम ११.२
सातारा९.५°अकोला११.७°यवतमाळ१०.५°

दिल्ली, उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतातही कडाक्याची थंडी पडली आहे. हवामान विभागाने भारताच्या अनेक राज्यांमध्ये शीत लहरीचा इशारा दिला आहे.

आजही हुडहुडी

रविवारीही थंडी जाणवेल. सोमवारी, मंगळवारी किमान तापमानात किंचित वाढ होईल. गुरुवारपासून किमान तापमान घसरण्यास सुरुवात होईल. नाताळपर्यंत हुडहुडी कायम राहील. - अथ्रेय शेटटी, हवामान अभ्यासक.

हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी साखर खाणं हानिकारकच, पण गूळ किती चांगला? जाणून घ्या सविस्तर 

Web Title : शीत लहर का अलर्ट जारी; क्रिसमस तक ठंड रहने की संभावना।

Web Summary : उत्तरी हवाओं के कारण महाराष्ट्र में ठंड का प्रकोप, शहरों में तापमान गिरा। फसलों पर असर डालने वाली शीत लहर क्रिसमस तक रहने की संभावना है। पुणे और नासिक जैसे शहरों में तापमान काफी कम दर्ज किया गया, मध्य सप्ताह में थोड़ी वृद्धि की उम्मीद है, फिर ठंड लौटेगी।

Web Title : Cold Wave Alert Issued; Chills to Persist Until Christmas.

Web Summary : Maharashtra experiences a cold snap due to northern winds, with temperatures plummeting across cities. The cold wave, impacting crops, is expected to last until Christmas. Cities like Pune and Nashik recorded significantly low temperatures, with a slight rise expected mid-week before the chill returns.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.