Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, कोणत्या भागात यलो अलर्ट?

मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, कोणत्या भागात यलो अलर्ट?

Marathwada warned of stormy rain, yellow alert in which area? | मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, कोणत्या भागात यलो अलर्ट?

मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, कोणत्या भागात यलो अलर्ट?

बुधवार व गुरुवारी बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता..वाचा काय आहे अंदाज

बुधवार व गुरुवारी बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता..वाचा काय आहे अंदाज

राज्यात पुढील दहा दिवसात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार आज बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान, आज तापमान ४० अंशांपर्यंत जात असून रात्र उष्ण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

उष्णतेच्या लाटेचीही शक्यता...

पावसाच्या शक्यतेसह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या अंदाजानुसार आज  बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

मराठवाड्यात या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, धारशिव, लातूर,नांदेड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Marathwada warned of stormy rain, yellow alert in which area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.