Join us

Marathawada Rain Update : २५ वर्षांतील विक्रम मोडला: मराठवाड्यात विक्रमी 'मे'मधील पाऊस वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:05 IST

Marathawada Rain Update : मे महिन्यात कडक उन्हाची सवय झालेल्या मराठवाड्यात यंदा हवामानाने चकित केले आहे. अवघ्या २४ तासांत तब्बल ३४ महसूल मंडळांतील ६८० गावांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, जालना जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. वाचा सविस्तर (Marathawada Rain Update)

Marathawada Rain Update : मे महिन्यात कडक उन्हाची सवय झालेल्या मराठवाड्यात यंदा हवामानाने चकित केले आहे. २७ ते २८ मे दरम्यानच्या सकाळी ८ पर्यंत अवघ्या २४ तासांत धुवाधार पाऊस पडला.(Marathawada Rain Update)

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, तब्बल ६८० गावांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ३४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली असून, सर्वाधिक पाऊसजालना जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे.(Marathawada Rain Update)

मे महिन्यात मराठवाड्याच्या पावसाने सर्व विक्रम मोडले आहेत. हवामान बदलामुळे कोरडे पडलेल्या पाणीसाठ्यांसाठी फायदेशीर ठरणारा हा पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टीच्या रूपात धोकादायकही ठरतो आहे. आगामी काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.(Marathawada Rain Update)

३४ महसूल मंडळांत अतिवृष्टी

छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ३४ महसूल मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामध्ये १७ महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या भागांत ६५ मिमी ते १०२ मिमी इतकी पावसाची नोंद झाली.

जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी (२४ तासांत)

जालना : ४४ मिमी

नांदेड : ३० मिमी

हिंगोली : २७ मिमी

बीड : २६ मिमी

लातूर, परभणी : प्रत्येकी २२ मिमी

धाराशिव : १० मिमी

संभाजीनगर विभाग : सरासरी २३.६ मिमी

महत्त्वाची गावानिहाय पावसाची नोंद (मिमीमध्ये)

परतूर (जालना) – १०२ मिमी

श्रीष्टी (जालना) – १०२ मिमी

मंठा – ७३ मिमी

रांजणी – ७९ मिमी

अष्टा (लातूर) – ९३ मिमी

वडवळ – ७० मिमी

कुंभारी, तीर्थपुरी, शेलगाव, बावणे – ६५ ते ७० मिमी

करमाड, कळमनुरी, गोळेगाव, वाकोडी, वारंगा, नांदापूर – ६५ मिमीच्या पुढे

मे महिन्यातच मोडला विक्रम

या वर्षी मे महिन्यात १७७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १३८९ टक्क्यांनी अधिक आहे.

मागील २५ वर्षांत मे महिन्यात इतक्या दिवस पावसाची नोंद ही पहिल्यांदाच झाली आहे. यावर्षी मे महिन्यात १६ दिवस पावसाची नोंद झाली, हे एक अभूतपूर्व उदाहरण ठरले आहे.

परिस्थिती

* अनेक गावांमध्ये चिखलवाट, वाहतुकीला अडथळे

* काही ठिकाणी शेतीच्या मशागतीला लागला ब्रेक

* जलसाठ्यांत लवकर वाढ होण्याची शक्यता

* हवामान बदलाचा स्पष्ट प्रभाव

हे ही वाचा सविस्तर : Marathawada Rain : मराठवाड्यावर निसर्गाचा कहर; पाऊस, वीज, पुर- संकटांचा तिहेरी फटका वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकहवामान अंदाजपाऊसजालनाशेतकरी