Join us
Daily Top 2Weekly Top 5

वारणा धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; आजमितीला धरणात किती टीएमसी पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:17 IST

Warana Dam Water चांदोली येथील वारणा धरणातून वीजनिर्मिती केंद्र, बाष्पीभवन, कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने १०.३१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.

चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातूनवीजनिर्मिती केंद्र, बाष्पीभवन, कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने १०.३१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.

गतवर्षीपेक्षा हा साठा १.७७ टीएमसीने जादा आहे. टंचाईग्रस्त १७ वाड्या व १३ गावांसाठी आराखडा तयार केला आहे. चांदोली धरणातून फक्त वीजनिर्मिती केंद्रातून नदीपात्रात १,४७०, तर कालव्यात ३०० असा एकूण १,७७० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

नदीकाठचे शेतकरी, पाणीपुरवठा योजना, वाकुर्डे बुद्रुक व म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडले आहे. या धरणाची ३३.४० टीएमसी क्षमता आहे.

गतवर्षी एकूण साठा २२.३२ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी १.७७ टीएमसी साठा जादा आहे. सध्या बाष्पीभवन होण्याचाही वेग वाढला आहे.

मोरणा धरणात ५१%, गिरजवडे ५६%, करमजाई ९८%, अंत्री खुर्द २९%, शिवणी ३२%, टाकवे ३१%, कार्वे २७% व रेठरे धरणात ९% पाणी साठा शिल्लक आहे.

४९ पाझर तलावांपैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. तर ० ते २५ टक्के पाणीसाठा असलेला फक्त १ तलाव आहे, तर २६ ते ५० टक्के पाणीसाठा असलेले २२ तलाव आहेत.

याशिवाय ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा असलेले ५ तलाव असून, ७६ ते १०० टक्के पाणीसाठा असलेले केवळ २ तलाव शिल्लक आहेत. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. ३३० कुपनलिकांची पाणी पातळी घटत आहे.

शिराळा तालुक्यातील कोरडे झालेले तलावहातेगाव (अंबाईवाडी), शिरसटवाडी, निगडी (कासारकी), भाटशिरगाव, निगडी (खोकडखडा), शिरशी (काळे खिंड), शिरशी (भैरववाडा), शिरशी (कासारकी), शिरशी नं. १, पावलेवाडी नं. १, पावलेवाडी नं. २, कोडाईवाडी नंबर १, शिवरवाडी, करमाळे नंबर २, कोडाईवाडी नं. २, तडवळे (वाडदरा), तडवळे नंबर १ हे शिराळा तालुक्यातील तलाव सध्या कोरडे पडले आहेत.

अधिक वाचा: इतिहासात पहिल्यांदाच कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळात उसाला मिळतोय उच्चांकी भाव; प्रतिटन किती रुपये दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Warna Dam Water Levels Drop: Current TMC Water Storage?

Web Summary : Water levels in Warna Dam have significantly decreased due to power generation and evaporation. Current storage exceeds last year's, but many minor irrigation tanks are drying up, impacting water supply in Shirala taluka.
टॅग्स :धरणपाणीशेतीसांगलीपीकवीजनदी