मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली असून, सोमवारी किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले.
मात्र, नवर्षाच्या सुरुवातीला पहिले पाच दिवस किमान तापमानाचा पारा खाली घसरणार आहे.
मुंबईचे किमान तापमान १५, तर महामुंबईमधील शहरांचे १२ आणि राज्यभरातील किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.
मुंबईकरांना सध्या थंडीचा फिल येत नसला तरी महामुंबईसह राज्यभरात बऱ्यापैकी गारवा टिकून आहे.
मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात बहुतांशी शहरे १० अंशांवर स्थिर आहेत, तर विदर्भात सर्वच शहरांचे किमान तापमान १० वर स्थिर आहे.
राज्यात गारवा असला तरी मुंबईकरांना नव्या वर्षाचे स्वागत थंडीने करता येणार आहे.
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई - १७
नाशिक - ९.८
ठाणे - १९
माथेरान - १६.६
सांगली - १२.४
अहिल्यानगर - ७.७
कोल्हापूर - १४.५
जेऊर - ९.५
छत्रपती संभाजीनगर - १०.५
गोंदिया - ८.८
सातारा - १०.८
नागपूर - ९.६
अधिक वाचा: जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल; नववर्षात आता कुणाला मिळणार किती धान्य?
