Maharashtra Weather Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान आहे तर काही जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर आज (८ डिसेंबर) रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागातील हवामान बदल होऊन नागरिकांना आता गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. राज्यात येत्या चार दिवसांत तापमानात घट होणार असून थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आला.
आज (८ डिसेंबर) पासून महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बहुतांश ठिकाणी पाऊसही झाला. परिणामी, काही भागात उकाडा जाणवू लागला आहे.
उद्या (९ डिसेंबर)पर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांनी थांबवल्याने अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांचा वेग वाढून अवकाळी पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे. आता कमी दाबाचा हा पट्टा ओसरला असून कोरडे वारे राज्यभर वाहणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी सल्ला* बदलत्या हवामानानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.* दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे.* पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.