Join us

Maharashtra Weather Update: रविवारी मुंबई, पुण्यासह राज्यात कसे असेल हवामान; IMDचा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 09:26 IST

Maharashtra Weather Update: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी पडलीये, मराठवाड्याचे किमान तापमानही १२ अंश सेल्सिअसने घसरले आहे. तर, मुंबई, पुण्यात मात्र कमाल तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Maharashtra Weather Update: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी(Cold) पडली आहे, मराठवाड्याचे किमान तापमानही १२ अंश सेल्सिअसने घसरले आहे. तर, मुंबई, पुण्यात मात्र कमाल तापमानात(Temperature) वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. येत्या काही दिवसात राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार असून थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

डिसेंबर महिन्यात ओढावलेलं अवकाळी पावसाचे(Rain) संकट महाराष्ट्रातून गेले आहे. आता राज्यात ऊन, थंडीचा खेळ सुरू झाला आहे. अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. आज (५ डिसेंबर) रोजी तापमानात काही ठिकाणी घट होईल तर काही ठिकाणी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी पडताना दिसत आहे तर मराठवाड्यात किमान तापमानही १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. तर, मुंबई, पुण्यात कमाल तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. येत्या काही दिवसात राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार असून थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये रविवारी आकाश सामान्यत: निरभ्र असेल. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

मुंबईतील किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ नोंदविली जाणार आहे. तसेच थंडीपासून थोडासा दिलासा मिळणार आहे. तर, पुणे शहरात ५ जानेवारी रोजी किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊ शकते.

पुण्यातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल, तसेच किमान तापमान १० अंशांवरून थेट १५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी पुण्यात धुके पडेल आणि त्यानंतर आभाळ ढगाळ असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यत: आकाश निरभ्र असेल. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात एका अंशाने घट होऊ शकते. तर, उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये ५ जानेवारी रोजी आकाश सामान्यत: निरभ्र असेल. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात नागपूरमध्ये थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. नागपूरमध्ये सामान्यत: आकाश निरभ्र असेल आणि कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

* पिकास, फळबागेस, भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : आता दव, धुके जाणवणार नाही, कसे असेल महाराष्ट्रातील हवामान? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमराठवाडाविदर्भमहाराष्ट्र