जानेवारी महिन्यात थंडीचा प्रभाव कायम होता. फेब्रुवारी सुरू झाला तरी थंडी अजून कायम आहे. ही थंडी पुढील आठवड्यात कमी कमी होत जाईल आणि फेब्रुवारीअखेरीस तापमानात वाढ होईल, असे हवामान तज्ज्ञ सांगतात.
सध्या पहाटे आणि रात्री थंडी असते, तर दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत आहेत. असे असले तरी तापमान ३० अंशांच्यापुढे अजून सरकले नाही.
यंदा थंडीचा प्रभाव कायम होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील तापमान हे राज्यातील सर्वात नीचांकी तापमान ठरले गेले आहे. हे अनेकदा घडले आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तापमानाचा पारा ५ ते ६ अंशांपर्यंत खाली आला होता. डिसेंबर-जानेवारीमध्ये हा पारा हळूहळू १० ते १५ अंशांपर्यंत वर गेला. त्यामुळे तापमानात किंचित वाढ होत गेली.
मात्र किमान तापमान १५ ते १७ अंशांवर तर कमाल तापमान २८ ते ३० अंशांवर आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच सूर्य आग ओकत आहे, अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही.
तापमानात मोठी वाढ झाली असे सध्या तरी काही नाही. थोडीफार थंडी अजूनही आहे. फेब्रुवारीअखेरीस थंडी कमी होऊन तापमानात वाढ होईल. त्यानंतर यंदाचा उन्हाळा कठीण असेल. त्यामुळे याबाबत आता उपाययोजना आवश्यक राहणार आहेत.
अधिक वाचा: जमीन 'एनए' करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; काय आहे नवीन निर्णय? वाचा सविस्तर
