Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update आज अवकाळी पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 10:07 IST

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उष्णतेची लाट आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागांत पावसाने देखील हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मागील तीन दिवस तापमानात घट झाली असताना गुरुवार, दि. ९ मे रोजी तापमानात वाढ झाली. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून शुक्रवार, दि. १० मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ मेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उष्णतेची लाट आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागांत पावसाने देखील हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरातही तापमानवाढ झाल्यानंतर त्यात घट झाली. आता पुन्हा तापमानात वाढ झाली असून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात तापमान वाढीमुळे हवेचे जोडक्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागात जोरदार पाऊस, तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांतील काही भागांत ९ मे ते १५ मे या काळात पाऊस पडणार आहे.

पावसाची शक्यता असल्याने सोलापुरात दिवसाचे तापमान जास्त असणार आहे. शनिवार, दि. ११ मे वगळता १३ मेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुरुवार ९ मे रोजी संध्याकाळी जोराचा वारा वाहत होता. त्यामुळे दुचाकीचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. त्यानंतर काही ठिकाणी पावसाचे थेंब पडले.

४२.२ अंश सेल्सिअस तापमानगुरुवार ९ मे रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. बुधवारी ४१.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. एका दिवसात १.१ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली. पाऊस आल्यास वाढत्या तापमानाला ब्रेक मिळू शकतो. त्यामुळे सोलापूरकर पावसाची अपेक्षा करत आहेत.

अधिक वाचा: Ujani Dam इतिहासात प्रथमच एवढं मोठ धरण वजा ६० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याचा अंदाज

टॅग्स :हवामानपाऊसतापमानसोलापूरमहाराष्ट्र