Join us

Maharashtra Weather Update : राज्यात मार्चमध्ये उष्णतेच्या दोन लाटा येण्याची शक्यता; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:02 IST

मुंबईसह राज्यभरात मार्चमध्ये दोन उष्णतेच्या लाटा येतील. त्यामुळे मुंबईत कमाल तापमानाची ३६, तर राज्यात बहुतांश ठिकाणी ४० अंश सेल्सिअसची नोंद होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात मार्चमध्ये दोन उष्णतेच्या लाटा येतील. त्यामुळे मुंबईत कमाल तापमानाची ३६, तर राज्यात बहुतांश ठिकाणी ४० अंश सेल्सिअसची नोंद होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

त्यामुळे उष्णतेच्या लाटा आता मार्चमध्येही होरपळवून काढण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये मुंबईचे तापमान एक ते दोन अंशानी वाढून ते ३६ अंश नोंदविले जाईल. तर राज्याचे कमाल तापमान सरासरी ४० अंश नोंदविले जाईल.

तापलेली शहरे (कमाल तापमान अं. से.)सोलापूर : ३८.९परभणी : ३८पुणे : ३७.७सातारा : ३७.५चिखलठाणा : ३७नाशिक : ३६.३उदगीर : ३६जळगाव : ३६मुंबई : ३५.३मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेली माहिती

मार्चमध्ये यंदा अधिक तापमान राहील. हवामान बदलाबाबत दोन दिवस आधीच अंदाज वर्तविला जाईल. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग

मंगळवारी, बुधवारी दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहील. - कृष्णानंद होसाळीकर, माजी हवामान अधिकारी.

अधिक वाचा: उन्हाळी भाजीपाला पिकात प्लास्टिक आच्छादन कराल तर हे होतील फायदे; वाचा सविस्तर

टॅग्स :हवामान अंदाजतापमानमुंबईमहाराष्ट्ररत्नागिरीसिंधुदुर्ग