Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात बदल होणार; पुढील आठवड्यात ३ दिवस गारपीटीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 08:52 IST

उत्तर भारतातील राजस्थान आणि काश्मिर परिसरात निर्माण होणाऱ्या पश्चिमी प्रकोपचा (वेस्टर्न डिस्टबर्न्स) विपरित परिणाम म्हणून आता राज्यासह मुंबईच्या हवामानात बदल होणार आहेत.

मुंबई : उत्तर भारतातील राजस्थान आणि काश्मिर परिसरात निर्माण होणाऱ्या पश्चिमी प्रकोपचा (वेस्टर्न डिस्टबर्न्स) विपरित परिणाम म्हणून आता राज्यासह मुंबईच्या हवामानात बदल होणार आहेत.

या बदलानुसार १७, १८ व १९ मार्च रोजी मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता आहे. मुंबईसह राज्य उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाले आहे.

नंदुरबारचे कमाल तापमान ४१.५ अंश नोंदविण्यात आले आहे. शनिवारीही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्ण वातावरण राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशीव, भंडारा, गडचिरोली, गोंदियात विजांचा कडकडाट होण्याचाही शक्यता वर्तवली आहे.

अधिक वाचा: तुम्ही जारचे थंड पाणी पिताय? सावधान! वाचा जारच्या पाण्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather: Change Expected; Hailstorm Likely in Next Week

Web Summary : Maharashtra's weather is set to change due to western disturbances. Hailstorms are predicted in Marathwada and Vidarbha on March 17-19. Mumbai and other regions will experience heat waves, with Nandurbar recording 41.5°C. Lightning is also expected in some districts.
टॅग्स :हवामान अंदाजतापमानपाऊसगारपीटमराठवाडाविदर्भमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमुंबई