Join us

Maharashtra Weather Update: बापरे! चंद्रपूर जगात सर्वांत उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 09:08 IST

Maharashtra Weather Update : विदर्भात सूर्य कोपला आहे. सोमवारी चंद्रपूर हे जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. येथे एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसात विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Chandrapur hot)

Maharashtra Weather Update : विदर्भात सूर्य कोपला आहे. सोमवारी चंद्रपूर हे जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. येथे एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसात विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Chandrapur hot)

खरोखरच बापरे म्हणण्याची वेळ चंद्रपूरवर आली आहे, कारण चंद्रपूर देशातच नव्हे, तर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. सोमवारी शहराचा पारा ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहचला. रविवारीही ते देशात पहिलेच होते. (Chandrapur hot)

आता पुढील ५ दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा IMD ने  दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी उन्हाच्या वेळेत काम करताना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सूर्याच्या ज्वाळा भट्टी पेटल्यासारख्या

विदर्भात सूर्याच्या ज्वाळांची भट्टी पेटल्यासारखी स्थिती आहे, कारण जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत चार शहरे विदर्भातीलच आहेत. चंद्रपूरनंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर जिल्ह्यातीलच ब्रम्हपुरी शहर असून, जेथे सोमवारचे तापमान ४५ अंश होते. अमरावती पाचव्या क्रमांकावर आहे. येथे सोमवारचा पारा ४४.६ अंशावर गेला आहे. यादीत ४४.१ अंशासह अकोला जिल्हा १२ व्या क्रमांकावर आहे.

जगातील सर्वांत उष्ण १५ पैकी ११ शहरे भारतातील

जगभरातील सर्वात उष्ण १५ शहरांमध्ये ११ शहरे एकट्या भारतातील आहेत. विदर्भातील ४ शहरांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावरील झारसुगुडा येथे ४५.४ अंश तापमान नोंदविण्यात आले. सहाव्या क्रमांकावर सिधी (४४.६), सातवे राजनांदगाव (४४.५), ९ व्या क्रमांकावर प्रयागराज व धूपुर (४४.३), ११ वे खजुराहो (४४.२), १४ वे आदिलाबाद (४३.८) आणि १५ व्या क्रमांकावर रायपूर (४३.७) यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे.* ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २० % २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर: Maharashtra Weather Update: देशात नागपूर सर्वांत हॉट; पारा @ ४४.७; विदर्भ होरपळला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भमराठवाडाकोकण