Maharashtra Weather Update : सूर्याने विदर्भावर आग ओकायला सुरुवात केली आहे. शनिवारी विदर्भातील चार जिल्हाांत पारा ४४ अंशांवर पार गेला. धक्कादायक म्हणजे ४४.७ अंश तापमानासह नागपूर (Nagpur) राज्यातच नाही, तर देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. (hot weather)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला व राजस्थानच्या कोटा येथे ४४.३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. भयंकर वाढलेल्या तापमानाने विदर्भवासी होरपळले असून, पुढचे चार दिवस नागरिकांना उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे. (hot weather)
गेल्या चार दिवसांपासून तापमानात हळूहळू वाढ होत आहे. चार-पाच दिवसांत अकोला शहरात ४४ अंशांहून अधिक तापमान नोंदविले जात आहे, जे राज्यात सर्वाधिक होते. मात्र, तापमानाची स्पर्धा लागल्यासारखी विदर्भात उष्णतेत वाढ होत आहे. (hot weather)
शुक्रवारी ४३ अंशांवर असलेले नागपूरचे तापमान २४ तासांत १.७ अंशांने वाढत थेट ४४.७ अंशांवर पोहोचले. त्यामुळे नागपूरकरांना होरपळल्यासारखे प्रचंड उष्णतेचे चटके बसायला लागले आहेत. (hot weather)
दुसरीकडे नागपूर, अकोल्यासह चंद्रपूर आणि वर्धा येथेसुद्धा शनिवारी ४४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यासह अमरावती ४३.८ व यवतमाळ येथे ४३.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. (hot weather)
ही शहरेसुद्धा उन्हाच्या तडाख्याने होरपळली असून, रस्त्याचे डांबर वितळायला लागले आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना शरीर भाजल्यासारखी जाणीव व्हायला लागली आहे. त्याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. रात्रीचा पारासुद्धा चढला असल्याने उष्ण रात्रीचा सामना करावा लागतो आहे.
दोन दिवस आधीच प्रकोप
दोन दिवस ढगाळ वातावरण व वादळाची शक्यता व्यक्त केली होती व त्यानंतर उष्ण लहरी येण्याचा अंदाज होता. मात्र, दोन दिवस आधीच सूर्याचा प्रकोप वाढला.
येत्या चार-पाच दिवस तापमान याच स्थितीत राहणार असून, नागरिकांना २३ एप्रिलपर्यंत उष्ण लाटांचा सामना करावा लागेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा व महापालिका प्रशासनाने केले आहे. (hot weather)
दोन दिवसांत अवकाळी?
येत्या दोन दिवसांत धाराशिव जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
हातातोंडाशी आलेल्या आंब्याची पडझड होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांची काढणी केलेले शेतमाल झाकून ठेवावे,असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेचा अलर्ट; काय आहे कारण वाचा सविस्तर