Join us

Maharashtra Weather Update : राज्यात या ठिकाणी नोंदविले सर्वात कमी तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 10:14 IST

राज्यात सध्या थंडीचा कडाका जाणवत असून, येत्या दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : राज्यात सध्या थंडीचा कडाका जाणवत असून, येत्या दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

साधारणपणे १ ते २ अंश सेल्सिअस तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे काही ठिकाणचे किमान तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. राज्यात अहिल्यानगरमध्ये सर्वांत कमी तापमान ११.७ नोंदवले गेले आहे.

राज्यामध्ये उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे गारठा वाढत आहे. आजपासून (दि. २४) राज्याच्या किमान तापमानात १ ते २ अंशांनी चढ किंवा उतार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत असून, शनिवारी (दि. २३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान १२-१३ अंशांवर नोंदवले गेले.

त्यामध्ये अहिल्यानगर १२.४, जळगाव १२.८, नाशिक १२.९, गोंदिया १२.५ यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली नोंदवला जात आहे.

राज्यातील किमान तापमानपुणे : १३.४अहिल्यानगर : ११.७जळगाव : १३.१कोल्हापूर : १७.१महाबळेश्वर : १३.९नाशिक : १३.०सोलापूर : १७.२मुंबई : २२.७नागपूर : १३.०

टॅग्स :हवामानतापमानपुणेअहिल्यानगरमहाराष्ट्रमराठवाडा