Join us

Maharashtra Weather Update : कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पुढील पाच दिवस वाढणार पावसाचा जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 10:07 IST

गेल्या काही वर्षापासून पावसाचे वार्षिक वेळापत्रक बदलत चालले असून जून-जुलै ऐवजी ऑगस्टमध्ये पावसाचा जोर वाढू लागला आहे.

गेल्या काही वर्षापासून पावसाचे वार्षिक वेळापत्रक बदलत चालले असून जून-जुलै ऐवजी ऑगस्टमध्ये पावसाचा जोर वाढू लागला आहे.

१७ ऑगस्टपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाच्या परतीला सुरुवात होते.

मात्र, गेल्या दोन तीन वर्षांपासून ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढलेला असतो. यंदाही ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.

पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे.

ऑगस्टच्या प्रारंभी पावसाने पाठ फिरवली आहे. राज्यातील काही भागांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही.अधिक वाचा: Kadvanchi Ranbhaji : पावसावर येणाऱ्या कडवंची रानभाजीला मोठी मागणी; कसे होतात आरोग्याला फायदे?

टॅग्स :हवामान अंदाजशेतीपाऊसमहाराष्ट्रशेतकरीपीक