Maharashtra Weather Update : एप्रिल महिन्यात एकीकडे अवकाळीचा मारा तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता मे महिन्यात कसे असेल हवामान हा प्रश्न पडला आहे. (IMD report)
राज्यातील काही भागांमध्ये अवकाळीचे सावट पाहायला मिळाले तर, मुंबई, ठाणे, रायगडसह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर मराठवाड्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळाले.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांमध्ये झालेल्या बदलामुळे सध्याची स्थिती कायम राहणार असून तापमानात आज फारसा चढ- उतार होणार नसल्याचे सांगितले आहे.(IMD report)
वादळी वाऱ्याची शक्यता
उद्या १ मे नंतर देशभरात वादळी वातावरणास सुरुवात होणार असून पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व वातावरणनिर्मितीस सुरुवात होईल आणि त्याचा परिणाम बाजुच्या राज्यांमध्येही दिसून येईल. उत्तर भारतामध्ये येत्या ४८ तासांनंतर मान्सूनपूर्व वातावरणामध्येच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (IMD report)
महाराष्ट्रात वादळी पाऊस की उष्णतेची लाट?
* मध्य प्रदेशात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे उन्हाचा चटका तुलनेने कमी होताना दिसत आहे. असे असले तरीही मराठवाड्यात मात्र तापमानात फारसा फरक पडलेला दिसत नाही.
* हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामानामुळे येत्या २४ तासांत नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागेल. पूर्व विदर्भात मात्र वादळी पावसाचा इशारा कायम असून, या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढचे ७२ तास महत्त्वाचे
* महाराष्ट्रात पुढचे ७२ तास उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता असून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान घराबाहेर जाणे टाळा, असा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.
* राज्यात दक्षिण-पूर्वेकडील जिल्हे पावसाचे नसून पुण्यासह उर्वरित भागात कोरडं उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. आता ३ मेनंतर राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होईल आणि मे महिन्याच्या मध्यानंतर मान्सूनपूर्व स्थिती निर्माण होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.