Join us

Maharashtra Weather Update: कोकण, विदर्भात तापमानवाढ; काय सांगतोय IMD रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:44 IST

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी ढगाळ हवामान तर कधी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणासह (Konkan) मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे.

Maharashtra weather news : राज्यातील हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी ढगाळ हवामान तर कधी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणासह (Konkan) मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे.

गेल्या २४ तासांत पारा ३८ अंशांवर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. राज्यात उष्मा वाढत असल्याने अनेक भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ ( Vidarbha) आणि कोकणातील (Konkan) काही भागात तापमानवाढ आता चिंतेचा विषय झाला आहे. राज्यातील सरासरी तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, किमान तापमान हे २२ अंश सेल्सिअसपर्यंत आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या किनारपट्टी (Konkan) क्षेत्रामध्ये तापमान ४ किंवा त्याहून जास्त अंशांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सरासरी तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या हाच इशारा मुंबईसह रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये जारी करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात दमट हवामानाचा इशारा जारी करण्यात आला असून, येत्या २४ तासांमध्ये तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

* कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड व पुर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: लोणावळा, कोकण किनारपट्टीत तापमानात वाढ; वाचा आजचा IMD रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजकोकणठाणेविदर्भमहाराष्ट्र