Join us

Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेची लाट कायम; IMD ने जारी केला अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:20 IST

Maharashtra Weather Update : राज्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यातील पारा आता ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. (Heat wave alert)

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसतोय. राज्यात सध्या सुर्यदेव आग ओकताना दिसत आहे. त्यामुळे पारा हा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची नोंद करण्यात आली आहे. (Heat wave alert)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात फक्त उष्णताच वाढणार नाही तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होईल. कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात परत एकदा अवकाळीचे ढग आहेत. (Heat wave alert)

एकीकडे पाऊस तर दुसरीकडे ऊन अशी स्थिती सध्या राज्यातील हवामानात पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकल्याचे बघायला मिळत आहे. विशेष: दुपारच्यावेळी उन्हाचे चटके अधिक जाणवत आहेत. (Heat wave alert)

चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

राज्यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. चंद्रपूरमध्ये ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. हेच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

शेतकऱ्यांना सल्ला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. नविन लागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: विदर्भावर सूर्यदेवाचा प्रकोप कायम; वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजकोकणमराठवाडाविदर्भचंद्रपूर