Join us

Maharashtra Weather Update : हवामानात बदल; विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 09:38 IST

Maharashtra Weather Update राज्यातील हवामानात मोठे बदल होताना दिसत आहे. थंडी हळूहळू कमी होणार असून आज विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील काही दिवस वातावरणातweather मोठे बदल होणार आहे. थंडीचाcold जोर हळूहळू कमी होताना दिसत असून किमान तापमानात वाढ झाली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टाcyclone पुढे सरकणार असून त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार असल्याने इशान्येकडील राज्यांत व विदर्भात पुढील दोन पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.विदर्भात २४ व २५ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असल्याने या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम मध्य आणि लगतच्या नैऋत्य बंगाल उपसागरावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी संध्याकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले आहे. हे डिप्रेशन आज सकाळी पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये असून येत्या १२ तासात ते पूर्व ईशान्य दिशेने हळूहळू सरकण्याची शक्यता आहे.

त्यानंतर समुद्रावरच त्याची तीव्रता टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुढील तीन दिवस चारही उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या दोन दिवसात म्हणजेच २४ व २५ डिसेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर उर्वरित कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या २४ तासात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. परंतु त्यानंतरच्या पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यात कसे असेल हवामान

पुणे आणि आसपासच्या परिसरात आज (२२) आणि उद्या (२३ डिसेंबर) रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

थंडी ओसरली

राज्यात मागील आठवड्यात कडक्याची थंडी पडली होती. या थंडीमुळे नागरिक हैराण झाले होते. तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरताना पाहायला मिळाले. मात्र, आता थंडी ओसरणार असून किमान तापमानात हळूहळू वाढ होईल. पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. मराठवाड्यात बहुतांश भागात गारठा कायम आहे तर किमान तापमानात वाढ देखील झाली आहे.

उत्तरेत थंडीचा कडाका कायम

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर कायम आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये कमालीची थंडी आहे. थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात गारठा वाढला होता.

शेतकऱ्यांना सल्ला काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानचक्रीवादळपाऊसविदर्भकोकण