Join us

Maharashtra Rain Alert : परतीचा मान्सून जोरदार; राज्यात आज व उद्या 'या' जिल्ह्यांत पडणार मुसळधार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 08:39 IST

Maharashtra Rain Alert मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच राज्यात पावसाने जोर धरला आहे. राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचा परतीचा प्रवास १५ सप्टेंबरदरम्यान सुरू होऊ शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी ही माहिती दिली.

Return Monsoon Upadate मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच राज्यात पावसाने जोर धरला आहे. राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित विजांसह सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारारायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारामुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा.वादळी पावसाचा इशारानंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

अधिक वाचा: सोळशीच्या जालिंदररावांनी ढोबळी मिरचीत केली नादखुळा कमाई; २० गुंठ्यात घेतले १५ लाखांचे उत्पन्न

टॅग्स :हवामान अंदाजमहाराष्ट्रपाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजकोकण