Join us

Yeldari Dam : येलदरी धरण भरण्याच्या मार्गावर; अवघ्या २४ तासांत ४५ दलघमी आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:28 IST

Yeldari Dam : गेल्या दोन दिवसांपासून येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक झाली आहे. फक्त २४ तासांत ४५ दलघमी पाणी दाखल झाल्याने धरणाचा साठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Yeldari Dam)

Yeldari Dam : गेल्या दोन दिवसांपासून येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक झाली आहे. फक्त २४ तासांत ४५ दलघमी पाणी दाखल झाल्याने धरणाचा साठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Yeldari Dam)

यामुळे यंदा धरण ऑगस्ट महिन्यातच भरू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याचा ओघ सुरू असून, कृषी आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बातमी आहे.(Yeldari Dam)

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. (Yeldari Dam)

मागील २४ तासांत तब्बल ४५ दलघमी पाणी धरणात दाखल झाले असून जलसाठा ६१ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे.(Yeldari Dam)

यावर्षी उन्हाळ्याअखेर येलदरी धरणात ४९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये भरउन्हाळ्यात अवकाळी पावसात या धरणात तब्बल एक टक्का पाणी वाढले होते. 

मात्र, त्यानंतर जून महिन्यात पावसाचा खंड पडला आणि पाणीसाठा पुन्हा ४९ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे येणाऱ्या काळात धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते की नाही, असा प्रश्न पडला होता.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात काही गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला, या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला. हे पाणी येलदरी धरणात दाखल होत आहे.

येलदरीत २४ तासांत ४५ दलघमी पाण्याची आवक, जलसाठा ६१ टक्क्यांवर त्यामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत आता वाढ व्हायला सुरुवात झाली असून, येणाऱ्या काळात पावसाचे प्रमाण असेच राहिले तर हे धरण ऑगस्ट महिन्यातच भरेल की काय, असा अंदाज बांधला जात आहे. 

सध्या जुलै महिना सुरू असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे येणाऱ्या काळात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास हे धरण यावर्षी ऑगस्ट महिन्यातच भरेल असा अंदाज नागरिकांमधून लावला जात आहे.

२३ जुलै रोजीचा पाणीसाठा

मृतसाठा१२४.६७० दलघमी
जिवंत साठा२९४.३९१ दलघमी
एकूण साठा६१९.०६१ दलघमी
पाणीपातळी४५८.४०० मीटर
मागील २४ तासांत पाण्याची आवक४२.७५५ / ९९.२१० दलघमी
जिवंत साठ्याची टक्केवारी६१.०५ टक्के

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water: जायकवाडीसाठी वैतरणेचा आधार; पुढील वर्षी मिळणार १६.५० टीएमसी पाणी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीपाणी कपातमराठवाडापूर्णा नदी