Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय, काय सांगतोय हवामान अंदाज 

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय, काय सांगतोय हवामान अंदाज 

Latest News Weather Update possibility of rain in Maharashtra in February see weather forecast | फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय, काय सांगतोय हवामान अंदाज 

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय, काय सांगतोय हवामान अंदाज 

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाचे आगमन होते आहे.

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाचे आगमन होते आहे.

Weather Update :  उद्या सोमवार दि. २ ते बुधवार दि. ४ फेब्रुवारी पर्यंतच्या ३ दिवसात महाराष्ट्रातील संगमनेर, अकोला, कोपरगांव, राहता, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर इ. तालुके व नंदुरबार व जळगांव जिल्हे इत्यादि व लगतच्या परिसरात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर २ ते ४ मिमी. इतक्या अगदी किरकोळ हलक्या पावसाची शक्यता जाणवते. गुरुवार दि. ५ फेब्रुवारी पासुन मात्र लगेचच ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते. 


फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील तापमान-              
शनिवार दि.७ फेब्रुवारी पर्यन्तच्या आठवड्यात महाराष्ट्रात पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यातील त्याच्या ह्या काळातील सरासरी तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने अधिक राहून थंडी ऐवजी उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्र तील १३ जिल्ह्यात थंडी ऐवजी रात्रीचा उकाडा जाणवेल.   
         
उर्वरित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात मात्र पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा सरासरी इतका राहून संमिश्र वातावरणाच्या अनुभवातून केवळ माफक थंडीची शक्यता जाणवते. 
                
उर्वरित फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील थंडी-                   
फेब्रुवारी महिन्यातील उर्वरित ३ आठवड्यात महाराष्ट्रात थंडी जाणवेल, परंतु मुंबईसह संपूर्ण कोकण खान्देश व मध्य महाराष्ट्र व छ. सं. नगर व जालना अश्या १९ जिल्ह्यात मात्र थंडीचे प्रमाण मात्र कमी असेल. 

फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील दिवसाचे  कमाल तापमान -                     
नाशिक व अहिल्यानगर असे दोन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत दुपारी ३ चे दिवसाचे कमाल तापमान सुद्धा दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाणवणाऱ्या कमाल तापमानापेक्षा, ह्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दुपारचे कमाल तापमान अधिक असेल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात दुपारीही उन्हाचा चटका जाणवेल. त्यामुळे रब्बीच्या बागायती शेत पिकांनाही ह्या महिन्यात अधिक सिंचनाच्या आवर्तनाची गरज भासण्याची शक्यता जाणवेल. 
                 
उर्वरित फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?
संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात भागानुसार पावसाचे प्रमाण सहसा शून्य ते १० मिमी.असते. चालु २०२६ च्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर छ. सं.नगर जालना अमरावती नागपूर भंडारा असे ६ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात पावसाची शक्यता ही सरासरी पेक्षा म्हणजे १० मिमी पेक्षा कमी असेल. म्हणजेच  संपूर्ण महिना  जवळपास  पावसाविना कोरडा जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

असे वातावरण कशामुळे झाले?
नेहमी जम्मू काश्मिर, लेह लडाख ह्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जाणारे पश्चिमी प्रकशोभ सध्या ह्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिक दक्षिणेकडे म्हणजे पंजाब राजस्थान राज्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जातांना, वाहणारे थंड व कोरडे वारे खान्देशसह सध्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. शिवाय ह्या बरोबरच सध्या महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वारे स्थित असल्यामुळे, बं. उपसागरातील वाहून येत असलेली आर्द्रता ह्या थंड वाऱ्यात मिसळत आहे. म्हणून खान्देश सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर ढगाचे सावट आहे.
             
अहिल्यानगर, छ. सं.नगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा, जिल्ह्यांत मात्र सरासरी इतक्या  म्हणजे शून्य ते १० मिमी किंवा त्या पेक्षा कमी इतक्या  किरकोळ पेंडकळवनी पावसाची शक्यता जाणवते. रब्बी पिकांच्या बाबतीत ही एक जमेची बाजू समजावी, इतकेच! 


- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title : महाराष्ट्र मौसम पूर्वानुमान: फरवरी में बारिश की संभावना और तापमान का अनुमान

Web Summary : महाराष्ट्र में फरवरी की शुरुआत में हल्की बारिश और बाद में गर्म रातें हो सकती हैं। अधिकांश जिलों में दिन का तापमान औसत से अधिक रहेगा। कुछ पूर्वी जिलों को छोड़कर बारिश औसत से कम होगी।

Web Title : Maharashtra Weather Forecast: February Rain Outlook and Temperature Predictions

Web Summary : Maharashtra may experience light rain in early February, followed by warmer nights. Most districts will have higher daytime temperatures than average. Rainfall will be below average, except in a few eastern districts.