Join us

Weather Update News: विदर्भात वीजांचा गडगडाट; पाच जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:12 IST

Weather Update News: राज्यात अवकाळी पावसाचे संकट वाढत चालले आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' हवामान विभागाने जारी केला आहे. वाचा सविस्तर (Vidarbha Orange Alert)

Weather Update News : राज्यात अवकाळी पावसाचे संकट वाढत चालले आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' हवामान विभागाने जाहीर केला आहे. (Vidarbha Orange Alert)

येत्या १४ व १५ मे रोजी गडगडाटी वादळासह पावसाचा अंदाज असून, विदर्भात उष्णतेची तीव्रता कमी होत तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा तब्बल ७ अंश सेल्सिअस खाली गेले आहे. (Vidarbha Orange Alert)

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील पिकांना चांगला फटका बसला आहे. (Vidarbha Orange Alert)

आठवडाभरापासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढचे तीन- चार दिवस कायम राहणार आहे. यात १४ व १५ तारखेला वेगवान वादळ व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस येण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Vidarbha Orange Alert)

उत्तरेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याची दिशा बदलल्याने विदर्भात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. विदर्भात गेल्या सहा दिवसांत काही जिल्ह्यांत विजेच्या कडकडासह तुरळक आणि सामान्य पावसाची नोंद झालेली आहे. पुढील दोन दिवस विदर्भात आकाशात ढग दाटलेले असतील. (Vidarbha Orange Alert)

मात्र, बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची दाट शक्यता असल्यामुळे हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. इतरही जिल्ह्यांत वादळी व पावसाळी वातावरण राहील, अशीच शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Vidarbha Orange Alert)

पावसाचा ऑरेंज अलर्ट

भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तापमानात मोठी घसरण

मे महिन्यात नागपूर आणि विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होते. यावर्षी पहिले १५ दिवस चटक्याविनाच असतील. सोमवारी कमाल तापमानात मोठी घसरण झाली. रविवारी ३९.६ अंशावर असलेला नागपूरचा पारा ३.२ अंशाने घसरला व ३५.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा तब्बल ७.१ अंशाने खाली आहे.बुलढाण्यात सर्वांत कमी ३४.५ अंशाची नोंद झाली. याशिवाय वर्धा ३६.५ अंश, भंडारा ३७.४ अंश, गोंदिया ३७.८ अंश, वाशिम ३७.६, चंद्रपूर ३९.६, यवतमाळ ३९ अंश या जिल्ह्यातही तापमानात घट नोंदविण्यात आली आहे. गडचिरोलीत तापमान वाढून ४०.६ अंशावर गेले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathawada Water shortage: ऐन उन्हाळ्यात धरणांतील पाणीपातळी घसरली; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रविदर्भहवामान अंदाजपाऊसशेतकरी