Cold Weather : अखेर पावसाने काढता पाय घेतला असून थंडीला सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंडीचे आगमन झाले आहे. पुढील काही दिवस कुठल्या थंडी राहील, याबाबत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे.
आजची थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती -
१०.८ अंश से. इतके किमान तापमान नोंदवून महाराष्ट्रात पहिल्या थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती आज जळगांवने अनुभवली आहे. हे किमान तापमान, सरासरीपेक्षा पाच डिग्रीने खाली नोंदवले गेले आहे. जळगांवचे कमाल तापमानही आज ३०.८ अंश से. नोंदवून सरासरीच्या २.७ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे.
थंडी वाढणार -
उद्या (रविवार, दि.८ नोव्हेंबर) पासून महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, छ. संभाजीनगर व उत्तर अहिल्यानगर अशा सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने तर विदर्भात २ डिग्रीने किमान तापमान खालावून सप्ताहभर म्हणजे शनिवार दि. १४ नोव्हेंबरपर्यंत चांगल्या थंडीची शक्यता जाणवते.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.
