Join us

Vidarbha Weather Update : विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:55 IST

Vidarbha Weather Update : विदर्भ पुन्हा मुसळधार पावसाच्या छायेखाली आहे. नागपूर, वर्धा, अमरावतीसह सर्व जिल्ह्यांत गुरुवारी दिवसभर सरींचा जोर राहिला. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला असून, शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.(Vidarbha Weather Update)

Vidarbha Weather Update : विदर्भ पुन्हा मुसळधार पावसाच्या छायेखाली आहे. नागपूर, वर्धा, अमरावतीसह सर्व जिल्ह्यांत गुरुवारी दिवसभर सरींचा जोर राहिला. (Vidarbha Weather Update)

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला असून, शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Vidarbha Weather Update)

काही दिवसांच्या उघडीपनंतर विदर्भावर पुन्हा पावसाचे सावट दाटले आहे. गुरुवारी नागपुरात सकाळच्या उकाड्यानंतर दिवसभर सरीवर सरी बरसत राहिल्या. वर्धा, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. (Vidarbha Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस तडाखेबाज पाऊस व विजांच्या कडकडाटाची शक्यता असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. (Vidarbha Weather Update)

पावसाचे कारण

दक्षिण ओरिसा ते उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यान ३.१ किमी उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. मान्सून आसाचे पश्चिम टोक गुजरातकडे सरकल्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून आर्द्रता खेचली जात आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात पावसाळी स्थिती तयार झाली आहे.

पावसाचा आकडा

नागपूर : ११ मिमी (सायंकाळपर्यंत)

वर्धा : २० मिमी

अमरावती : २७ मिमी

गोंदिया : १९ मिमी

चंद्रपूर : सकाळपर्यंत ३५ मिमी + दिवसा ५ मिमी

गडचिरोली : ३०.४ मिमी

यवतमाळ : सकाळपर्यंत १८.८ मिमी

तापमान व आर्द्रता

सकाळी तापमान ३४.५ अंश सेल्सिअस होते, जे सायंकाळी ३२.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.

आर्द्रता सकाळी ७८% वरून सायंकाळी ९५% पर्यंत पोहोचली.

पुढील दोन दिवसांसाठी हवामान अंदाज

विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित.

काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि गडगडाट होऊ शकतो.

शेतकरी व नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* पिकांमध्ये पाणी साचू देऊ नका, निचरा यंत्रणा कार्यरत ठेवा.

* कीडनियंत्रणासाठी फवारणी तातडीने टाळावी तसेच हवामान स्थिर झाल्यावरच करावी.

* कापणीस तयार असलेल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य आच्छादनाचा वापर करा.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Crop Crisis : मराठवाड्यात पुन्हा पावसाचा तडाखा; नांदेड, लातूर, धाराशिव पिके पाण्यात वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रविदर्भहवामान अंदाजपाऊसशेतकरी