Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाची प्रणाली सक्रिय झाली असून, पुढील तीन दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. (Vidarbha Weather Update)
परतीच्या पावसाची नेहमीची तारीख विदर्भासाठी १५ ऑक्टोबर असल्याने अजून पंधरा दिवसांपर्यंत पावसाचा कालावधी सुरू राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.(Vidarbha Weather Update)
गेल्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी अतिजोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली; तर विदर्भातील काही भागांतही दमदार सरी कोसळल्या. (Vidarbha Weather Update)
अकोल्यात मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी सुरू झाली आहे.(Vidarbha Weather Update)
विदर्भातील पाऊस
विदर्भात मलकापूर येथे १०.८ से.मी. पावसाची नोंद झाली असून, सिंदखेड राजा ६.१, देऊळगाव राजा ४.९, मालेगाव ४.३, वाशिम ४.२, मंगरुळपीर ४, चिखली ३८, मोताळा ३.५, रिसोड ३.३, बार्शीटाकळी ३.१, लोणार ३, चिमूर २.९, नागपूर २.९, अमरावती २.८, कुरखेडा २.७, गोंदिया २.६, अकोला २.५, आमोरी २.३, मानोरा २.३, धारणी २, शेगाव २, रामटेक १.९, पोंभुर्णा १.९, मौदा १.८, मेहकर १.८, पवनी १.७, खामगाव १.७, भिवापूर १.५, मुलचेरा १.५, भामरागड १.४, पाटूर १.४, कुही १.४, बालापूर १.३, बुलढाणा १.३, देवरी १.३, कामठी १.३, सेलू १.२, दर्यापूर १.२, मोर्शी १.१, नरखेड १.१, सिंदेवाही १.१, चांदूर बाजार १, हिंगणा १, पारशिवनी १ से.मी. पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात तीन दिवस पाऊस प्रणाली सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने पुढील तीन दिवस विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील परतीच्या पावसाची सामान्य तारीख १५ ऑक्टोबर आहे. - डॉ. प्रवीण कुमार, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या उभ्या पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
* कापसाच्या बोंडावर पाणी साठल्यास बोंड सडू शकते; निचरा व्यवस्थापन करा.
* जोरदार पावसाच्या काळात कीटकनाशक/खतांची फवारणी टाळा. पाऊस थांबल्यानंतरच फवारणी करा.