Join us
Daily Top 2Weekly Top 5

Weather Report : पुढील पाच दिवस हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 17:39 IST

पुढील पाच दिवस तापमान वाढण्याची शक्यता इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्राने वर्तवली आहे.

वाढत्या उन्हाचा कडाका नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्याचप्रमाणे हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान ३४-३६ डिग्री सें. व किमान तापमान १५-१७ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग ९-१२ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने वर्तवली आहे. 

विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार 16 मार्च रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत, 17 मार्च रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत, 18 मार्च रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत, 19 मार्च रोजी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत, 20 मार्च रोजी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत असणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस उन्हाचा कडाका जाणवणार आहे. मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात उन्ह वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तसेच या दिवसात पशुधनातील लाळ व खुरकत या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक लस टोचुन घ्यावी. तसेच लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासुन बाजुला ठेवावे. कोरडे व उष्ण हवामान लक्षात घेता दुभत्या जनावरांची तसेच पशुधन (गाय, म्हैस, शेळी व मेंढी इ. ) यांचे योग्य गोठा व्यवस्थापन, आहार नियोजन तसेच आरोग्य व्यवस्थापनावर करून उष्णतेचा ताण कमी करावा. तापमानाचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी पिकांना पाणी द्यावे. उन्हाळी मुग पिकाची पेरणी पूर्ण करावी. उन्हाळी भुईमुग, सुर्यफुल, भेंडी इ. पिकांची लागवड रुंद सरी वाफ्यावर करावी म्हणजे पाण्याची बचत होवुन उत्पादनात वाढ होईल. मिरची व वांगी रोपे तयार झाली असल्यास रोपांची पुनर्लागवड करावी लागवडीचे वेळेस संपूर्ण खतमात्रेच्या ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे, असे आवाहान करण्यात आले आहे. 

 सौजन्य     ग्रामीण कृषी मौसम सेवा            कृषि हवामान प्रक्षेत्र विभागमहात्मा फुले कृषी विद्यापीठ,           विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी ता. इगतपुरी, जि. नाशिक 

टॅग्स :शेतीइगतपुरीहवामाननाशिक