Join us

Tapi Mega Recharge Project : तापी मेगा रिचार्ज परियोजनेवर महापंचायत; जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:22 IST

Tapi Mega Recharge Project : तापी मेगा रिचार्ज (Tapi Mega Recharge) परियोजनेवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारांनी सह्या केल्या असल्या तरी मेळघाटातील १४ गावे आणि मध्यप्रदेशातील ८ गावे यामुळे बुडीत क्षेत्रात जाणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर स्पष्टता मिळवण्यासाठी १९ मे रोजी तापी महापंचायतीची (Mahapanchayat) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. (Tapi Mega Recharge)

Tapi Mega Recharge Project : तापी मेगा रिचार्ज परियोजनेवर (Tapi Mega Recharge) महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारांनी सह्या केल्या असल्या तरी मेळघाटातील १४ गावे आणि मध्यप्रदेशातील ८ गावे यामुळे बुडीत क्षेत्रात जाणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.  (Tapi Mega Recharge)

या मुद्द्यावर स्पष्टता मिळवण्यासाठी १९ मे रोजी तापी महापंचायतीची (Mahapanchayat) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारांनी तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर मेळघाटातील ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकल्पात धारणी तालुक्यातील १४ गावांचा समावेश असल्याने ही गावे पूर्णपणे बुडणार की केवळ जमिनी जाणार, याबाबत स्पष्टता नाही.  (Tapi Mega Recharge)

माहितीअभावी स्थानिक पातळीवर भीती आणि गोंधळ निर्माण झाला असून, या संदर्भातील सत्यता समजून घेण्यासाठी १९ मे रोजी महापंचायतीचे(Mahapanchayat) आयोजन करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यात तापी मेगा रिचार्ज परियोजनेच्या (Tapi Mega Recharge) करारनाम्यावर स्वाक्षऱ्या झाल्या.

या दरम्यान सिंचन विभागाच्या तीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने १६ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या पत्राने मेळघाटात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या परियोजनेमध्ये राज्यातील १४ गावे आणि मध्य प्रदेशातील ८ गावांचा समावेश असल्याचे आणि  केवळ जमिनी जाणार असल्याचे यात नमूद आहे. तथापि, केवळ जमिनी जाणार की गावे बुडीत क्षेत्रात जाणार, याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (Tapi Mega Recharge)

मेळघाटातील शासकीय कार्यालयांकडून परियोजनेबाबत इत्थंभूत माहिती मिळण्याची अपेक्षा असताना अद्याप धारणी मुख्यालयाकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. त्याचे निराकरण महापंचायतीमध्ये होणार आहे. (Tapi Mega Recharge)

'त्या' १४ गावांचे काय होणार?

* तापी मेगा रिचार्ज परियोजनेमध्ये धारणी तालुक्यातील १४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्या गावांचे काय होणार, याबाबत १९ मे रोजी तापी महापंचायतीद्वारे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

* या बैठकीमध्ये प्रशासनाकडून योजनेबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल. त्यानंतर आमची भूमिका ठरणार असल्याचे तापी पंचायतीचे अध्यक्ष डॉ. रवी पाटील यांनी सांगितले.

ग्रामस्थांशी चर्चा करून ठरणार दिशा

* तापी परियोजनेबाबत माहिती येताच महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक मन्ना दारसिबे यांनी प्रशासनाविरुद्ध ताल ठोकला. ज्या गावांचा यादीमध्ये समावेश आहे, अशा सर्व गावांचे दौरे व लोकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाबाबत भूमिका ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 तापी मेगा रिचार्ज योजनेबाबत आतापर्यंत आमच्या कार्यालयापर्यंत कोणतेही दस्तऐवज आलेले नाहीत. लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे, जेणेकरून लोकांचे या विषयावर समाधान होईल. - प्रदीप शेवाळे, तहसीलदार, धारणी

हे ही वाचा सविस्तर : Tapi Water Recharge : तापी जलपुनर्भरण राष्ट्रीय प्रकल्प घोषित होणार? १९ कोटींची तरतूद वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतापी नदीनदीपाणीमहाराष्ट्रमध्य प्रदेशशेतकरी