Sina-Kolegaon Dam Water Storage : धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परंडा तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणे, प्रकल्प आणि तलाव भरभरून वाहू लागले आहेत.(Sina-Kolegaon Dam Water Storage)
खासापुरी, चांदणी, साकत प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून, सर्वात मोठा सीना-कोळेगाव प्रकल्प ९४ टक्के क्षमतेने भरला आहे.(Sina-Kolegaon Dam Water Storage)
येत्या दोन दिवसांत हा प्रकल्पही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, मदतीची मागणी वाढली आहे.(Sina-Kolegaon Dam Water Storage)
दमदार पावसामुळे आवक वाढली
धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या दमदार पाऊस सुरू आहे. २ हजार ७०० क्युसेक या दाबाने प्रकल्पात पाण्याची आवक सुरू असून, पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.(Sina-Kolegaon Dam Water Storage)
शेतकऱ्यांचे नुकसान
मागील आठ दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी/उल्फा नदीला पूर आला आणि अनेक गावांचा संपर्क तुटला.
नदीकाठच्या शेतांमध्ये उस, मका, उडीद, तूर, सोयाबीन, कपाशी, कांदा यासह विद्युत मोटारी, पाईप, वायर आणि इलेक्ट्रिक बोर्ड पुराच्या पाण्यात वाहून गेले. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रशासनाचा इशारा
सीना-कोळेगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरताच प्रकल्पातून सीना नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित स्थळी हलावे, जनावरे व मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता कल्याणी कालेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी मागणी
परंडा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून शेतीपिके, जनावरे व घरांचे नुकसान झाले आहे. मात्र, महसूल प्रशासनाने फक्त वाशी तालुक्यातील महसूल मंडळांचा अतिवृष्टीत समावेश केला आहे.
त्यामुळे परंडा विधानसभा क्षेत्रातील सर्व महसूल मंडळांचा यात समावेश करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
अनाळा साठवण तलावात पाणी सोडण्याची मागणी
सीना-कोळेगाव प्रकल्प भरत असून, या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी अनाळा उपसा सिंचन योजनेमार्फत अनाळा साठवण तलावात वळवावे, अशीही मागणी माजी आमदार मोटे यांनी केली आहे.