Lokmat Agro >हवामान > सध्याची पावसाची ही स्थिती कशामुळे? अन् सोयाबीन, मकाबाबत महत्वाचं आवाहन 

सध्याची पावसाची ही स्थिती कशामुळे? अन् सोयाबीन, मकाबाबत महत्वाचं आवाहन 

Latest News See reason for current rainfall situation an important appeal regarding soybeans and maize sowing | सध्याची पावसाची ही स्थिती कशामुळे? अन् सोयाबीन, मकाबाबत महत्वाचं आवाहन 

सध्याची पावसाची ही स्थिती कशामुळे? अन् सोयाबीन, मकाबाबत महत्वाचं आवाहन 

Agriculture News : सध्या पडणाऱ्या पावसाचे नेमके कारण काय? तसेच सोयाबीन, मका लागवडीबाबत काय निर्णय घ्यावा? हे समजून घेऊया..

Agriculture News : सध्या पडणाऱ्या पावसाचे नेमके कारण काय? तसेच सोयाबीन, मका लागवडीबाबत काय निर्णय घ्यावा? हे समजून घेऊया..

शेअर :

Join us
Join usNext

Monsoon Rain : सध्या कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी (Maharashtra Rain) ठोस अशी बळकट वातावरणीय प्रणाली जाणवत नाही. अरबी समुद्रात, महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी दरम्यान तटीय हवेचा कमी दाब पट्ट्यामुळे मुंबई व कर्नाटक किनारपट्टी दरम्यान जोरदार पाऊस होत आहे.

शिवाय राजस्थानमधील स्ट्रॉंग चक्रीय वाऱ्याच्या प्रणालीमुळे गुजरात व मध्य प्रदेश मध्ये ही जोरदार पाऊस होत आहे. या तीन्हही ठिकाणच्या जोरदार पावसाच्या प्रेरित परिणामातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव येथे सध्या दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता जाणवते   

सोयाबीन पेरणी- 
पुढील आठवड्यातही कोकणात जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहेच.  महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मात्र जून महिन्यात म्हणावा असा विशेष अति जोरदार पाऊस अजूनही झालेला नाही. येणाऱ्या आठवड्यात विशेष अशा जोरदार पावसाची शक्यता जाणवत नाही.    
        
सध्याची संचित ओल व उत्तम वाफसा सध्या सोयाबीन पेरणी शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. पेरणीत चार इंचावर पडणारे सोयाबीनचे बियाणे, सध्याचा वाहणारा वारा व पडू शकणारे कडक ऊन यामुळे जमीन थरातील सुकणारी वरची खपली आणि बिजांकुरास पडू शकणारे नेट यावर साधारण उतारा मिळेलही, पण त्यानंतर आवश्यक असणाऱ्या पावसाची शक्यता सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे बळजबरी केलेली पेरणी कदाचित फसवी ठरु शकते,. कारण अजुन हा जून महिनाच आहे, याचाही विसर पडू नये, असे वाटते.
       
त्यामुळे २९ जूनच्या आसपास, हवामान अंदाजाचा कानोसा घेऊन कृषी विभागाच्या सल्ल्यासह, जमिनीच्या वरच्या थरात चांगली चिळ-बिळीत ओल आल्यावरच पेरणी करावी. तसाही सोयाबीन पेरणीस अजूनही विशेष उशीर झालेला नाही, असे एकंदरीत वाटते. शेवटी निर्णय आपलाच असावा. 

मका व कपाशीची लागवड 
लागवड झालेल्या व उतरून पडलेल्या मका व कपाशी पिकाला मात्र सिंचन करण्यास हरकत नाही, असे वाटते.  वातावरणात काही बदल झाल्यास सूचित करता येईल.  

- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title: Latest News See reason for current rainfall situation an important appeal regarding soybeans and maize sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.