Maharashtra Rain Alert : गेल्या आठ दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेला मान्सून (Monsoon Rain) जागेवरच खिळलेला असुन त्यात प्रगती नाही. खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजुन मान्सून पोहोचलेला नाही.
अजूनही आठ दिवस म्हणजे १९ जूनपर्यंत पावसासाठी वातावरण (Rain Alert) विशेष अनुकूल नसले तरी आज व उद्या (७, ८ जून शनिवार, रविवार) आणि १३ जून शुक्रवार असे तीन दिवस नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात व मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे.
विशेषतः वरीलपैकी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात आजपासुन पुढील आठ दिवस म्हणजे शनिवार दि.१४ जूनपर्यंत मृग नक्षत्राच्या मध्यम पावसाची शक्यता (Rain Alert) अधिक जाणवते.
मराठवाड्यातील ८ तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र गुरुवार दि. १२ जून पासून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. थोडक्यात १३ जून शुक्रवारपासुन मंदावलेल्या मान्सून प्रवाह सक्रिय होवून पुढे वाटचालीस चालना मिळू शकते, असे वाटते.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.