Lokmat Agro >हवामान > Rain Update : यंदा कुठल्या नक्षत्रात जोरदार पाऊस? अशी आहेत यंदाची नक्षत्रे 

Rain Update : यंदा कुठल्या नक्षत्रात जोरदार पाऊस? अशी आहेत यंदाची नक्षत्रे 

Latest News rain Update which nakshatra rain increased in 2025 see details | Rain Update : यंदा कुठल्या नक्षत्रात जोरदार पाऊस? अशी आहेत यंदाची नक्षत्रे 

Rain Update : यंदा कुठल्या नक्षत्रात जोरदार पाऊस? अशी आहेत यंदाची नक्षत्रे 

Rain Update : ८ जूनपासून मृग नक्षत्राला (Paus nakshtra) प्रारंभ होत आहे.

Rain Update : ८ जूनपासून मृग नक्षत्राला (Paus nakshtra) प्रारंभ होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भंडारा : मे महिन्यापासून अवकाळी पाऊसाचे (Avkali Paus) थैमान घातले असताना ८ जूनपासून मृग नक्षत्राला (Paus nakshtra) प्रारंभ होत आहे. शिवाय यंदा कोणते नक्षत्र बरसणार या चर्चाना उधाण आले आहे. 'मृगाची पेरणी, धनधान्य देई' ही परंपरा याही वर्षी कायम राहील, असे बोलले जात आहे. दुसरीकडे हवामान खात्याच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

शेती व्यवसाय (Farming) हा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसामुळे जमीन ओलीचिंब झाली असली तरी, पेरणी कधी करावी आणि शेतीची कोणती कामे कोणत्या नक्षत्रात करावीत. यासाठी अनेक शेतकरी नक्षत्रांवरच अधिक विश्वास ठेवून आहेत. ते परंपरा जपत पेरणीचा मुहूर्त साधतात. 

रोहिणी नक्षत्राला (Rohini Nakshtra) २५ मेपासून सुरुवात झाली आहे. या नक्षत्राचे वाहन म्हैस असले तरी जमीन अधिक तापलेली असल्याने या नक्षत्रातील पाण्याचा उपयोग प्रामुख्याने जमीन मशागतीसाठी होत असतो. तर आजपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. 

जाणकार शेतकऱ्यांच्या मते खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने यंदा ८ जूनपासून म्हणजे मृग नक्षत्र सुरुवात होते. त्याचे वाहन कोल्हा आहे. त्यामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यंदा मृग नक्षत्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नक्षत्र, हवामान विभाग आणि मोबाइल अॅपवरील माहितीचे गणित जुळवून शेतकरी अंतिम निर्णय घेणार आहेत. 

पूर्वीपासून शेतकरी नक्षत्रांवर अवलंबून राहिले आहे. परंतु, आधुनिक युगातील शेतकरी हवामान विभागाचे अंदाज आणि मोबाइल अॅपवरील माहितीनुसारच पेरणीचे नियोजन करणार आहेत. नक्षत्रांवर अवलंबून पेरणी करण्याचे दिवस आता मागे पडत चालले आहे.
- उमेश तुमसरे, शेतकरी, पालोरा

अशी आहेत यंदाची नक्षत्रे 
८ जूनपासून मृग नक्षत्र कोल्हा वाहन असेल. २२ जून आद्रा नक्षत्र उंदीर वाहन असेल. ०५ जुलै पुनर्वसू नक्षत्र घोडा वाहन असेल. १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्र मोर वाहन असेल. ०२ ऑगस्टपासून आश्लेषा नक्षत्र गाढव वाहन असेल. ०६ ऑगस्ट पासून मेघा नक्षत्र बेडूक वाहन असेल. ३० ऑगस्ट पासून पूर्वा नक्षत्र म्हैस वाहन असेल. १३ सप्टेंबर पासून उत्तरा नक्षत्र कोल्हा वाहन असेल. २७ सप्टेंबर पासून हस्त नक्षत्र मोर वाहन असेल. १० ऑक्टोंबर पासून चित्रा नक्षत्र हत्ती वाहन असेल. तर शेवटचं नक्षत्र २४ ऑक्टोबर पासून स्वाती हे असेल आणि बेडूक वाहन असेल.

Web Title: Latest News rain Update which nakshatra rain increased in 2025 see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.