Lokmat Agro >हवामान > Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस 'या' जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता!

Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस 'या' जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता!

Latest news possibility of sporadic rain in few district for next three days in maharashtra | Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस 'या' जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता!

Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस 'या' जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता!

Rain Alert : उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यातील या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे.

Rain Alert : उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यातील या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Rain Alert : गेल्या ५-६ दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेल्या मान्सूनची (Monsoon) अजुनही प्रगती नाही. खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजुन मान्सून पोहोचलेला नाही.
             
सध्याचे १०-१२ दिवस म्हणजे १९ जूनपर्यंत पावसासाठी (Monsoon Rain alert) वातावरण अनुकूल नसले तरी उद्या गुरुवार दि. ५ जूनपासून पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार दि. ७ जूनपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
            
विदर्भातील ११ जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता (Rain Alert) या तीन दिवसात जाणवते. कोकण -मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. रविवार दि. ८ जूननंतर, वातावरणातील बदलानुसार पुढील माहिती सूचित करता येईल. 

- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title: Latest news possibility of sporadic rain in few district for next three days in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.