lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > Water Storage : भंडारदरा धरणात अवघा 16 टक्के तर निळवंडे धरणात 14 टक्के जलसाठा, वाचा सविस्तर 

Water Storage : भंडारदरा धरणात अवघा 16 टक्के तर निळवंडे धरणात 14 टक्के जलसाठा, वाचा सविस्तर 

Latest news Only 16 percent in Bhandardara Dam and 14 percent in Nilavande Dam, read in detail | Water Storage : भंडारदरा धरणात अवघा 16 टक्के तर निळवंडे धरणात 14 टक्के जलसाठा, वाचा सविस्तर 

Water Storage : भंडारदरा धरणात अवघा 16 टक्के तर निळवंडे धरणात 14 टक्के जलसाठा, वाचा सविस्तर 

आजमितीस अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात अवघा १६ तर निळवंडेत १४ टक्के जलसाठा आहे.

आजमितीस अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात अवघा १६ तर निळवंडेत १४ टक्के जलसाठा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अहमदनगर : आजमितीस अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात अवघा १६ तर निळवंडेत १४ टक्के जलसाठा असून, तालुक्यातील ४ गावे २९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसागणिक पाणीटंचाईचे भीषण दुर्भिक्ष्य गडद होत असून, जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. सद्यस्थितीत निळवंडेत ११८२ दशलक्ष धनकूट इतके तर भंडारदरा जलाशयात १७७४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

अकोले तालुक्यातील प्रथम पाणीटंचाईची झळ सोसणारे मुधाळण व मन्याळे ही दोन गावे मन्याळेच्या गवारवाडी, पिरसाईवाडी, माळवाडी, विलासनगर, पिसेवाडी, कळंब गावची परतनदरा, गारवाडी, हांडेवाडी, डोंगरवाडी, मासेरेवस्ती, देवठाण धरणाच्या पाणलोटात उघडेवस्ती, पथवेवस्ती, गिन्हेवाडी, मेनखिंड, खडकेवाडी, गांगडवाडी, मुथाळणेची पागीरवाडी, ठाकरवाडी, कानडवाडी, नायकरवाडी या २० वाडांची तहान टैकरने भागवली जात होती. यात नव्याने आंभळे व तिरडे ही दोन गावे आणि नऊ वाड्या वाढल्या असून, आता ४ गावे २९ वाड्यांना टँकरने २१ खेपा पाणीपुरवठा केला जात आहे. 

अकोले हा डोंगराळ भाग असल्याने सरकारी टेकरनेव पाणीपुरवठा केला जातो. भंडारदरा धरणाच्या वॉलमधून १०३१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर निवंडेतून कालव्यांमध्ये १५० क्यूसेक व प्रवरा नदीपात्रातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. आढळा प्रकल्पात ४२५ दशलक्ष घनफूट पाणी असून, उजव्या डाव्या कालव्यांतून ७० क्युसेकने आवर्तन सुरू आहे. पिंपळगाव खांड ९६, अंबित - ४८, बलठण - १९, कोथळे ४८, देवहंडी शिरपुंजे - २०, बदगी बेलापूर १४, बोरी - ११, घोटी शिळवंडी ३९, वाकी - ५१, टिटवी - ५२, सांगवी १४, पाडोशी २१ अशा छोट्या-मोठ्या लघुपाटबंधारे तलाव प्रकल्पांमध्ये एकूण ४३३ दशलक्ष घनफूट पाणी आहे. 


पाणी हंड्यात पोहोचणार का?
जल जीवनच्या चिरखुड्या गावोगावी दिसतात: पण, या योजनेचे पाणी कधी लोकांच्या घरात हंड्यात पोहोचणार, हा प्रश्न आहे. २०१८ - २९ सारखी पाणीटंचाईची तालुक्यातील परिस्थिती आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात कोणताही हलगर्जीपणा नाही. ४ गावे, २९ वाड्यांची २९ खेपा देऊन टँकरने तहान भागविली जात आहे.
- राजेंद्र भोर, पंचायत समिती टंचाई विभाग

Web Title: Latest news Only 16 percent in Bhandardara Dam and 14 percent in Nilavande Dam, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.