Join us

Gangapur Dam : नाशिकचे गंगापूर धरण 97 टक्के भरले, जिल्ह्यातील इतर धरणे किती भरली? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 21:35 IST

Gangapur Dam : आज ०१ सप्टेंबरपर्यंत २६ धरणांमध्ये जवळपास ९४ पाणीसाठा जमा झाला आहे. 

Gangapur Dam :    नाशिक जिल्ह्यातील (Nashik Dam Storage) बहुतांश भागात पावसाची सतंतधार सुरूच आहे. त्यामुळे अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली असून गेल्या काही दिवसांपासूनचा विसर्ग कायम आहे. आज ०१ सप्टेंबर पर्यंत २४ धरणांमध्ये जवळपास ९४ पाणीसाठा जमा झाला आहे. 

आज ०१ सप्टेंबरपर्यंत जवळपास दहा धरण १०० टक्के भरली असून १८ धरणांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये गंगापूर धरण ९७.१० टक्के, कश्यपी ९९.४१ टक्के, गौतमी गोदावरी ९८ भरले असून आळंदी धरण १०० भरले आहे. 

तसेच पालखेड धरण ८९.२८ टक्के, करंजवण धरण ९४.१० टक्के, तळ वाघाड धरण १०० टक्के भरले आहे. पुणेगाव धरण ८८ टक्के, तिसगाव आणि ओझरखेड धरण १०० टक्के भरले आहे.

दारणा धरण ९५.८६ टक्के, मुकणे धरण ९८ टक्के, कडवा धरण ९५ टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधारा ५४ टक्के, वाकी ९१  टक्के तर भाम, वालदेवी आणि भावली धरण १०० टक्के भरले आहे.  

भोजापूर धरण ९५.८४ टक्के, चनकापूर धरण ८६.५७ टक्के, केळझर धरण ९८.२५ टक्के, गिरणा धरण ९१.३९ टक्के, पुण्यात धरण ८६.५४ टक्के, तर हरणबारी, नागा साक्या आणि माणिकपुंज ही धरण १०० टक्के भरली आहेत.

टॅग्स :गंगापूर धरणनाशिकधरणमहाराष्ट्रशेतीपाऊस