Lokmat Agro >हवामान > Nashik Cold Wave : निफाड 5.6 अंशावर, हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर 

Nashik Cold Wave : निफाड 5.6 अंशावर, हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Nashik Winter Update Niphad records season's lowest temperature at 5.6 degrees, know details | Nashik Cold Wave : निफाड 5.6 अंशावर, हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर 

Nashik Cold Wave : निफाड 5.6 अंशावर, हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर 

Nashik Cold Wave : कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ५.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली.

Nashik Cold Wave : कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ५.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Nashik Winter Update : नाशिक जिल्हा गारठला असून निफाड तालुक्यात (Niphad Cold Wave) पारा घसरण सुरुच आहे. सोमवार दि १६ रोजी पारा ५.६ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात करण्यात आली आहे. तर रविवारी हेच तापमान ६.१ अंशावर होते. त्यामुळे आज पुन्हा तापमानात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 

निफाड तालुक्यात (Temperature Down) थंडीचा पारा पुन्हा कमी होऊन सोमवारी पारा कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ५.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली. यावर्षीच्या सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यावर्षी थंडी उशिराने सुरू झाली दिनांक ३० नोव्हेंबर रोजी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने तालुका गारठला होता. 

नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यात दरवर्षी कडाक्याची थंडी अनुभवयास मिळते. निफाड तालुक्यात २ डिसेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण होते आणि ५ डिसेंबरला अवकाळी पावसाचा तडाखा निफाड तालुक्याला बसला. त्यामुळे कांदा, व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र त्यानंतर एकाच दिवसात ५ अंश सेल्सिअसने तापमान कमी होऊन सोमवारी दि ९ डिसेंबर रोजी सकाळी ६.७ इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका थंडीने गारठून गेला होता. 

द्राक्ष बागांना फटका 

दरम्यान १४ डिसेंबर रोजी सकाळी ७.२ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याने निफाड तालुका थंडीने गारठून गेला. रविवारी रोजी ६.१ इतक्या नीचांकी तापमानाची नोंद यात झाली. सोमवारी म्हणजेच आज १६ डिसेंबर रोजी ५.६ अंश तापमान नोंदवले गेले. वाढत्या थंडीमुळे निफाड तालुक्यातील द्राक्षबागायतदारांचे धाबे दणाणले आहे. ऐन द्राक्षमाल फुगणवणीच्या काळात थंडीचा जोर वाढल्याने द्राक्षाच्या फुगवणीवर परिणाम होणार आहे. शिवाय या कडाक्याच्या थंडीमुळे परिपक्व झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाऊन नुकसानीचा धोका वाढला आहे. 
 

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' बारा जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News Nashik Winter Update Niphad records season's lowest temperature at 5.6 degrees, know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.