Join us

Nashik Darana Dam : दारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ, नदीने धोक्याची पातळी ओलांडली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 11:16 IST

Nashik Darana Dam : दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून दारणा नदीला पूर आला आहे. 

नाशिक : इगतपुरी तालुक्यात (Igatpuri) गेल्या वीस दिवसांपासून संततधार सुरु असतांनाच शनिवारपासून मुसळधार पावसाने तालुका जलमय झाला आहे. दारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर भाम. भावली धरणे भरली असल्याने या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढविण्यातआला आहे. दारणा धरणातून (Darna Dam) सायंकाळी ५ वाजेनंतर १९ हजार ९७२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे दारणा नदीला पूर आला आहे. 

इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात सकाळी ८ वाजेपर्यंत ६९ मिमी पाऊस झाला असून, एकूण १६०६ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास धुवाधार पावसाने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळपासून पुन्हा धुवांधार पावसाला सुरवात झाली. तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रातही जोराचा पाऊस सुरू झाल्याने अनेक धरणे ओसंडून वाहू लागले आहे तर पावसाला सुरुवात झाली. कमी जलसाठा असलेल्या धरणांमध्येही जलसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. 

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दारणा नदीला तसेच भाम, भावली या नद्यांनाही पूर आला आहे. या नद्यांनाही आपले नदीपात्र ओलांडून बाहेर पसरल्याने शेतांना या पूरपाण्याचा फटका बसू लागला आहे. पूर्वभागात नुकतीच भात पिकांची लागवड झाल्याने पुराचे पाणी शेतांमध्ये पसरल्याने ही रोपे वाहून जाण्याच्या स्थितीत आहेत. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. इगतपुरी तालुक्यात महिनाभरातच वार्षिक सरासरीच्या एकूण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने सरासरीही ओलांडली आहे. तालुक्यात चोवीस तासात सकाळी ८ वाजेपर्यंत ६९ मिमी पाऊस झाला असून, एकूण १६०६ मिमी पाऊस झाल्याची स्थिती आहे., 

१९,९७२ क्यूसेकने दारणा धरणातून विसर्ग

दारणा धरणातून दिवसभरात अनेकवेळा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १९,९७२ क्यूसेक वेगाने विसर्ग वाढविण्यात आला. या दारणा व कडवा धरणात ८५ टक्के जलसाठा कायम ठेवून हा कडवा (विसर्ग सुरू) विसर्ग सुरू आहे, तर कडबा धरणातूनही ३२०० क्यूसेक वेगाने धरणांमध्येही जलसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दारणा नदीला तसेच भाम, भावली या नद्यांनाही पूर आला तर भावलीतून २८२१ क्यूसेक वेगाने विसर्गे सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले. इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, धरणातून विसर्गदेखील वाढविण्यात आला आहे. 

टॅग्स :नाशिकगंगापूर धरणपाऊसहवामानपाणी