Join us

Nashik Dam Water : नाशिकची धरणे ओसंडले; मराठवाड्यासाठी किती टीएमसी आले पाणी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:35 IST

Nashik Dam Water : नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे धरणसाठा ९८ टक्के क्षमतेवर पोहोचला आहे. तब्बल १२ धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने आतापर्यंत मराठवाड्यासाठी ६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक विसर्ग होत असून मराठवाड्यातील जनतेला पाण्याचा दिलासा मिळणार आहे. (Nashik Dam Water)

Nashik Dam Water : गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ९८ टक्क्यावर पोहोचला आहे. दारणा, गंगापूरसह १२ धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली असून आतापर्यंत मराठवाड्यासाठी तब्बल ६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. (Nashik Dam Water)

यामुळे मराठवाड्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. (Nashik Dam Water)

तब्बल १२ धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली असून दारणा (९९.५८%), गंगापूर (९८.८५%), चणकापूर (९५.५५%), करंजवण (९८.७३%) यांसह अनेक मोठ्या धरणांचा साठा ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत मराठवाड्यासाठी ६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. (Nashik Dam Water)

धरणांतून सुरू असलेला विसर्ग

दारणा – ४६०० क्यूसेक

गंगापूर – २०३० क्यूसेक

कश्यपी – ३२० क्यूसेक

वालदेवी – १७४ क्यूसेक

आळंदी – २४३ क्यूसेक

भावली – ४८१ क्यूसेक

भाम – ९३७ क्यूसेक

वाघाड – ५४४ क्यूसेक

पालखेड – ८५६ क्यूसेक

पुणेगाव – ७५ क्यूसेक

ओझरखेड – २४ क्यूसेक

नांदूरमध्यमेश्वर – ९४६५ क्यूसेक

गौतमी गोदावरी – २८८ क्यूसेक

करंजगाव – ५९६ क्यूसेक

एकूण ४९,६५७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४७,७७४ क्यूसेक विसर्ग करण्यात आला होता. म्हणजे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १,९०० क्यूसेकने अधिक पाणी सोडण्यात येत आहे.

पावसाची स्थिती

जूनपासून आतापर्यंतच्या हंगामी पावसात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

जास्त पावसाची नोंद : दिंडोरी (६४७.७ मिमी – ११६.५%), निफाड (३८९.१ मिमी – ११२.७%), मालेगाव (३९०.१ मिमी – १०८.८%), नांदगाव (४१२.८ मिमी – ११०.५%).

कमी पाऊस : सुरगाणा (६३.९%), इगतपुरी (६४.५%), देवळा (७२.९%), कळवण (७१.४%).

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५८०.९ मिमी (७७.४%) पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा जवळपास क्षमतेवर पोहोचल्याने मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. दिंडोरी, निफाड, मालेगावसारख्या तालुक्यांमध्ये पावसाने जोर धरला असला तरी सुरगाणा, इगतपुरीसारख्या डोंगराळ भागात पावसाची कमतरता जाणवत आहे. एकूणच जिल्ह्यात पाणीसाठा समाधानकारक पातळीवर असल्याने रब्बी हंगामासाठी दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Dam Storage : मांजरा, तेरणा आणि कुंडलिका धरणातून हजारो क्युसेक विसर्ग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीनाशिकमराठवाडा