Join us

नाशिकची 'ही' बारा धरणे 100 टक्के भरली, गंगापूर धरणंही 98 टक्क्यांवर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 20:10 IST

Nashik Dam Storage : यामुळे जिल्ह्यातील धरणांचा साठा कमालीचा वाढला असून आजमितीस ९१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Nashik Dam Storage :    गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik Dam Water Level Today) बहुतांश भागात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांचा साठा कमालीचा वाढला असून आजमितीस ९१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर मागील वर्षी या दिवशी ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. 

नाशिक जिल्ह्यातील एकूण 26 प्रकल्पांपैकी बारा धरणे शंभर टक्के भरले असून यामध्ये कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भाम, हरणबारी, नागासाक्या आणि माणिकपुंज धरणाचा समावेश आहे. 

तर जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या गंगापूर धरणातही (Gangapur Dam) ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणातून जवळपास ०३ हजार २५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी याच दिवशी ८९.८४ टक्के होते. 

उर्वरित धरणांचा पाणीसाठा पालखेड धरण ८३.४६ टक्के, करंजवण धरण ९३.८७ टक्के, पुणे गाव धरण ८८.२५ टक्के, दारणा धरण ९५.८६ टक्के, मुकणे धरण ९८.०४ टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधारा ८४.०५ टक्के, वाकी धरण ९१.८९ टक्के, भोजापुर धरण ९७.५१ टक्के, चणकापूर धरण ८६.२४ टक्के, गिरणा धरण ७७.८५ टक्के, तर पुनद धरण ८६.५४ टक्के भरले आहे.

टॅग्स :गंगापूर धरणशेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसधरणमहाराष्ट्र