Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील एकूण २६ प्रकल्पांपैकी १२ धरणे १०० टक्के भरले असून इतर सर्व धरणे ९५ टक्क्यांच्यावर भरले आहेत. आज ०९ सप्टेंबर पर्यंत गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून या धरणातून ११३६ पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील कश्यपी, आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भाम, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे १०० टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ९७.३४ टक्के जलसाठा जमा झाला आहे, जो मागील वर्षीपेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे.
धरण साठा स्थिती पाहुयात...
यामध्ये गंगापूर धरण ९७.१० टक्के, गौतमी गोदावरी ९९.७९ टक्के, पालखेड ८५.१५ टक्के, करंजवण ९८.७३ टक्के, पुणेगाव ९७.७५ टक्के, दारणा ९९.५८ टक्के, मुकणे ९८.०४ टक्के, कडवा ९७.८७ टक्के, नांदूर मध्यमेश्वर १९.०७ टक्के, वाकी ९४.०८ टक्के, भोजापूर ९७.५१ टक्के, चणकापूर ९५.५५ टक्के, गिरणा ९६.३९ टक्के, पुनद ९१.४२ टक्के अशी धरणांची स्थिती आहे.
असा आहे धरणांचा विसर्ग
दारणा - १४०० क्युसेक, गंगापूर - ११३६ क्युसेक, काश्यपी - ३२० क्युसेक, वालदेवी - १७४ क्युसेक, आळंदी - ४४६ क्युसेक, भावली - २९० क्युसेक, भाम - ६६० क्युसेक, वाघाड - ८४७ क्युसेक, पालखेड - ८३० क्युसेक, पुणेगाव - ४५० क्युसेक, ओझरखेड - ४४२ क्युसेक, नांदूरमध्यमेश्वर - ४७६९ क्युसेक, करंजवण - ४५१ क्युसेक, वाकी - १९६ क्युसेक, कडवा - ८४० क्युसेक, तिसगाव - ७२ क्युसेकने विसर्ग सुरु आहे.