Montha Cyclone : भारतीय उत्तर महासागरीय क्षेत्रात म्हणजे वि्षुववृत्तच्या उत्तरेकडील असलेल्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात तयार होणारी उष्णकटीबंधीय चक्रीवादळानाच नावे दिली जातात.
ही नावे या समुद्र सभोवताली असलेले पण जागतिक हवामान संघटनेचे सदस्य असलेल्या देशाकडून सुचवली जातात. सभोवतालच्या १३ देशांची नांवे अल्फाबेट नुसार खालील प्रमाणे आहेत.
बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी-अरबस्तान, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमीरात व येमेन अशा १३ आशियाई देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रादेशिक भाषेत चक्रीवादळासंबंधी सुचवलेली नावे व बनवलेल्या यादीनुसार अनुक्रमानुसार नाव दिले जाते.
इंग्रजी अल्फाबेट नुसार १३ देशांची नांवे एका खाली एक पहिल्या कॉलम मध्ये लिहिली जातात. तर प्रत्येक देशाने सुचवलेली नांवे त्या त्या देशासमोर एका रेषेत लिहिली जातात. आता आलेल्या चक्री वादळासाठी थायलंड देशाने सुचवलेल्या 'मोंथा' नांव दिले आहे. मोंथा ' चा 'थाई' भाषेतील अर्थ म्हणजे ' सुवासिक फुल ' होय.
या पूर्वीच्या चक्रीवादळाला श्रीलंकेने सुचवलेले 'शक्ती' नांव दिले होते. मोंथा नंतर येणाऱ्या चक्रीवादळाला संयुक्त अरब अमीरात देशाने सुचवलेले ' सेन- यार ' म्हणजे ' सिंह ' असा अर्थ असलेले नांव दिले जाईल.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune
हेही वाचा : मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील 'या' भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर
