Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Monsoon Update : राज्यात येत्या दहा जूनपर्यंत हवामान कसे राहील? पाऊस होईल का?

Monsoon Update : राज्यात येत्या दहा जूनपर्यंत हवामान कसे राहील? पाऊस होईल का?

Latest News Monsoon Update How will weather and rainfall be in maharashtra for next ten days | Monsoon Update : राज्यात येत्या दहा जूनपर्यंत हवामान कसे राहील? पाऊस होईल का?

Monsoon Update : राज्यात येत्या दहा जूनपर्यंत हवामान कसे राहील? पाऊस होईल का?

Monsoon Update : येत्या दहा जूनपर्यंत राज्यात हवामान कसे राहील? पाऊस होईल का? जाणून घेऊयात..

Monsoon Update : येत्या दहा जूनपर्यंत राज्यात हवामान कसे राहील? पाऊस होईल का? जाणून घेऊयात..

Monsoon Update : बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या (Monsoon) प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे.

किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस (Light rain) पडण्याचा अंदाज आहे. 

राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा (Marathwada rain) व खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील. 

या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

मराठवाडा करिता हवामान अंदाज 
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दि. 01 जून ते 05 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील.

तसेच दि. 06 ते 12 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Latest News Monsoon Update How will weather and rainfall be in maharashtra for next ten days