Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > नक्षत्रांच्या वाहनांवरून कसा काढायचा पावसाचा अंदाज? कुठल्या नक्षत्रात सर्वदूर पाऊस? 

नक्षत्रांच्या वाहनांवरून कसा काढायचा पावसाचा अंदाज? कुठल्या नक्षत्रात सर्वदूर पाऊस? 

Latest news Monsoon rain How to predict rain from constellations see details | नक्षत्रांच्या वाहनांवरून कसा काढायचा पावसाचा अंदाज? कुठल्या नक्षत्रात सर्वदूर पाऊस? 

नक्षत्रांच्या वाहनांवरून कसा काढायचा पावसाचा अंदाज? कुठल्या नक्षत्रात सर्वदूर पाऊस? 

Monsoon Rain : सध्या काही भागात पाऊस सुरु असून काही भागात मृगातील कोल्हा वाहन चकवा देत आहे.

Monsoon Rain : सध्या काही भागात पाऊस सुरु असून काही भागात मृगातील कोल्हा वाहन चकवा देत आहे.

गडचिरोली : अवकाळी पाऊस (Unseasonal rain) खरिपाच्या बाह्य मशागतीसाठी फायद्याचा ठरला. त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी शेताची नांगरणी, वखरणी आटोपली. काहींनी धानाचे पन्हे टाकले आहेत. सध्या काही भागात पाऊस सुरु असून काही भागात मृगातील कोल्हा वाहन चकवा देत आहे. आता आर्द्रातील उंदीर सर्वदूर पाऊस घेऊन येणार का, याकडे लक्ष आहे.

२५ मेपासून पावसाचा पहिला नक्षत्र रोहिणीला (Rohini Nakshtra) सुरुवात झाली. मात्र या नक्षत्रात पावसाची फारशी अपेक्षा नसते. परंतु यावर्षी उलटे झाले. या कालावधीत पाऊस झाला. मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरुवात झाली. या नक्षत्रात काही भागात जोरदार पाऊस सुरु असून काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे.

जोखीम उचलत काही शेतकरी धानाचे पन्हे टाकत आहेत. २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्रात उर्वरित भागात पुरेसा पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

वाहनांवरून कसा काढायचा अंदाज ?
पावसाचा अंदाज घेताना त्या नक्षत्रासाठी असलेल्या वाहनाला फार महत्त्व आहे. वाहनावरून पावसाचा अंदाज शेतकऱ्याला येतो. प्रत्येक वर्षी अंदाजानुसार वाहन बदलत असते, हे विशेष. हत्ती, बेडूक आणि म्हैस ही वाहने असल्यास भरपूर पाऊस पडतो. उंदीर, गाढव, मेंढा हे वाहन असल्यास कमी पाऊस अपेक्षित आहे. तर मोर, कोल्हा, घोडा हे वाहन असल्यास मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज असतो.

आवत्याकडे वाढला कल 
अवकाळी पावसामुळे शेतजमिनीची मशागत करण्यास शेतकऱ्यांना बराच वेळ मिळाला. त्यामुळे आवत्या पद्धतीने पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांची अधिक पसंती आहे. सदर पद्धतीने धानाची पेरणी केल्यास उत्पादन खर्च कमी येतो आणि उत्पादन रोवणी पद्धतीच्या प्रमाणेच येतो, असा आता अनुभव असल्याने या वर्षात मोठ्या प्रमाणे आवत्या पद्धतीने पेरणी होत आहे.

Web Title: Latest news Monsoon rain How to predict rain from constellations see details